आयपीएल २०२२च्या १९व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत झाली. दिल्लीने हा सामना ७ विकेट्स राखून जिंकला. दिल्लीच्या फलंदाजीवेळी १९व्या षटकात असे काही घडले, ज्यामुळे त्यांचा प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि मैदानातील पंच यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सला चांगली सुरुवात मिळाली होती. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर जबरदस्त फॉर्ममध्ये दिसले आणि त्यांनी पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागादारी केली. पृथ्वी शॉने २९ चेंडूत ५१, तर डेविड वॉर्नरने ४५ चेंडूत ६१ धावा केल्या. परंतु सलामीवीर जोडी बाद झाल्यानंतर दिल्लीची फलंदाजी गडबडली. नंतर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) जेव्हा मैदानात आला, तेव्हा त्याने दमदार खेळ दाखवला. यादरम्यान प्रशिक्षक रिकी पॉंटिंग (Ricky Ponting) मात्र मैदानातील पंचांसोबत वाद घालत असल्याचे दिसले.
दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना २१५ धावा उभ्या केल्या, पण एक वेळ अशी आली होती, जेव्हा संघ २०० धावा करू शकेल असे वाटत नव्हते, पण शार्दुल ठाकूरने मैदानात आगमन केल्यानंतर चित्र बदलले. उमेश यादवने टाकलेल्या १९व्या षटकात शार्दुलने चांगलीच धुलाई केली. उमेशच्या या षटकातील दुसरा चेंडू निर्धाव गेला. यानंतर रिकी पाँटिंग मैदानातील पंचांकडे काहीतरी तक्रार करताना दिसले. पाँटिंगच्या या वागणुकीवरून चाहते सोशल मीडियावर चर्चा करत आहेत.
https://twitter.com/JalaluddinSark8/status/1513122484798730246?s=20&t=8FWVTw_eyDr43bDJrX-L0g
https://twitter.com/think_shubham/status/1513123866951897092?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1513123866951897092%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket%2Fricky-ponting-fighting-umpire%2F
https://twitter.com/_DontTellAny1/status/1513123547052339207?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1513123547052339207%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket%2Fricky-ponting-fighting-umpire%2F
I am sorry for doubting you @RickyPonting and @RishabhPant17. I love you guys🥰https://t.co/fEhlacvp4V
— Manan Anand (@paisosexual) April 10, 2022
https://twitter.com/JalaluddinSark8/status/1513122484798730246?s=20&t=8FWVTw_eyDr43bDJrX-L0g
दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (SC vs KKR) यांच्यात रविवारी (१० एप्रिल) खेळल्या गेलेल्या या सामन्याचा विचार केला, तर दिल्लीने ४४ धावांनी विजय मिळवला. केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने ५ विकेट्सच्या नुकसानावर २१५ धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआरचा संपूर्ण संघ १९.४ षटकात सर्वबाद झाला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘विराट भैय्या आणि फाफसोबत मजा येतेय’, मुंबईविरुद्ध अर्धशतक झळकावणाऱ्या पठ्ठ्याची मोठी प्रतिक्रिया
एमएस धोनीला तंबूत धाडल्यानंतर ‘हा’ पठ्ठ्या आहे भलताच खुश; म्हणाला, ‘मी चिंतेत होतो, पण…’
एकच मारला, पण विक्रमी ठरला! रिषभ पंतचा केकेआरविरुद्धचा षटकार ठरला विक्रमी, बनला ‘नंबर १’