मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा (आयपीएल २०२२, IPL 2022) थरार रंगणार आहे. आयपीएलच्या या पंधराव्या हंगामाची सुरुवात २६ मार्चपासून होणार असून २९ मे रोजी हंगामाची अखेर होईल. मात्र हा हंगाम सुरू होण्यापूर्वीच आयपीएलच्या दुसऱ्या सर्वात यशस्वी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाला मोठा झटका बसला आहे.
त्यांनी या मेगा लिलावात ज्या खेळाडूवर सर्वाधिक पैसे खर्च केले, तोच खेळाडू या हंगामातील सुरुवातीच्या सामन्यांना किंवा पूर्ण हंगामालाच मुकण्याची शक्यता आहे. तो खेळाडू दिपक चाहर (Deepak Chahar) असून भारताचे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra) यांनी या वेगवान गोलंदाजाच्या पर्यायी खेळाडूंची (Deepak Chahar Replacements) नावे सांगितली आहेत.
कोलकाता येथे झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या अंतिम आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात चाहरला दुखापत (Deepak Chahar Injured) झाली होती. त्यामुळे तो श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेतूनही बाहेर पडला होता. चेन्नईने १४ कोटींची बोली लावत विकत घेतलेला चाहर दुखापतीतून सावरण्यासाठी बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) उपचार घेत आहे. म्हणजेच आता तो आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर असेल. त्यामुळे चेन्नई संघ त्याच्या पर्यायी खेळाडूच्या शोधात असेल. अशात क्रिकेट समालोचक आकाश चोप्रा यांनी चेन्नई संघाला चाहरचे काही पर्याय सुचवले आहेत.
https://www.instagram.com/reel/CaosPNmALmS/?utm_source=ig_web_copy_link
आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर चोप्रा यांनी व्हिडिओ शेअर केला असून ते म्हणत आहेत की, “मेगा लिलावात चाहरला मोठी किंमत मिळाल्यानंतर मला खूप आनंद झाला होता. कारण मी आधीच त्याच्यावर मोठी बोली लागण्याचा अंदाज वर्तवला होता आणि तो माझा चांगला मित्रही आहे. त्यामुळे चाहरला मोठी किंमत मिळाल्यामुळे मी आनंदी होतो. पण आता अशी बातमी आली आहे की, तो आयपीएल २०२२ मधूनच बाहेर होतोय. दुर्देवी, त्याच्यासोबत आताच असे व्हायचे होते का. या बातमीने चेन्नई फ्रँचायझीला अडचणीत टाकले आहे. आता त्यांना चाहरचा पर्याय शोधावा लागेल.”
पुढे चाहरच्या पर्यायांची नावे सांगताना चोप्रा म्हणाले की, “माझ्या मते इशांत शर्मा, धवल कुलकर्णी आणि संदिप वॉरियरच्या ३ खेळाडू आहेत, ते चाहरचा पर्यायी खेळाडू म्हणून चेन्नई संघात जाऊ शकतात. इशांत आणि धवल खूप अनुभवी आहेत. त्यातही मला वाटते, धवलच तो खेळाडू असेल, ज्याला एमएस धोनी संघात घेईल.”