इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा उद्घाटन सामना शनिवारी (२६ मार्च) गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि गतउपविजेते कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यात झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सीएसके संघ ५ बाद १३१ धावा करू शकला. सीएसकेचे १३२ धावांचे आव्हान केकेआरने १८.३ षटकातच ४ विकेट्सच्या नुकसानावर पूर्ण केले आणि ६ विकेट्स राखून सामना जिंकला.
मात्र हंगामातील पहिलाच सामना (IPL 2022 1st match) गमावलेल्या सीएसकेसाठी काही सकारात्मक गोष्टीही घडल्या. सीएसकेकडून त्यांचे सर्वात वयस्कर खेळाडू एमएस धोनी आणि ड्वेन ब्रावो (Dwyane Bravo) यांनी शानदार प्रदर्शन केले. धोनीने फलंदाजीत तर ब्रावोने गोलंदाजीत जबरदस्त खेळ दाखवला. दरम्यान ब्रावोने त्याच्या दमदार गोलंदाजी प्रदर्शनासह एका मोठ्या विक्रमाची बरोबरी (Dwyane Bravo Equals Lasith Malinga) केली आहे.
ब्रावोने आयपीएल इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या विक्रमात (Most Wickets In IPL) लसिथ मलिंगा (Lasith Malinga) याची बरोबरी केली आहे. मलिंगाने १२२ आयपीएल सामने खेळताना १७० विकेट्स घेतल्या होत्या. तो आयपीएल इतिसाहातील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. मात्र आता ब्रावोने त्याची बरोबरी आहे. ब्रावोने केकेआरविरुद्ध १५२ वा सामना खेळताना १७० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. केकेआरच्या डावातील १८ व्या षटकात सॅम बिलिंग्जला तुषार देशपांडेच्या हातून झेलबाद करत त्याने मलिंगाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
DJ WWWale Bravo! 🤩#WhistlePodu #Yellove pic.twitter.com/NWjujkBgP5
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 26, 2022
ब्रावो पोहोचला अव्वलस्थानी
केकेआरविरुद्धच्या सामन्यापूर्वी (CSK vs KKR) ब्रावोच्या खात्यात आयपीएलमध्ये १६७ विकेट्स होत्या. मलिंगाच विक्रम मोडण्यासाठी त्याला ४ विकेट्सची गरज होती. मात्र त्याने या सामन्यात ४ षटके गोलंदाजी करताना २० धावा देत ३ विकेट्स घेत मलिंगाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. त्याने केकेआरच्या वेंकटेश अय्यरला सातव्या षटकात धोनीच्या हातून झेलबाद करत पहिली विकेट घेतली होती. वेंकटेश १६ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर ब्रावोने २१ धावांवर खेळत असलेल्या नितीश राणाला आपली शिकार बनवले. तसेच शेवटी २५ धावांवर खेळत असलेल्या बिलिंग्जला बाद करत सर्वाधिक विकेट्सच्या विक्रमात संयुक्तपणे अव्वलस्थानी विराजमान झाला आहे.
ब्रावो आणि मलिंगानंतर अमित मिश्रा १६६ विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या पियुष चावलाने १५७ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आजचा सामना: केव्हा आणि कसा पाहाल दिल्ली वि. मुंबई सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही
IPL2022| पंजाब वि. बेंगलोर सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
IPL2022| मुंबई वि. दिल्ली सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!