---Advertisement---

PAK VS BAN; पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर बांग्लादेश क्रिकेट संघावार पैशांचा पाऊस!

---Advertisement---

बांग्लादेश संघाने अलीकडेच पाकिस्तानविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकून इतिहास रचला होता. बांग्लादेशने पाकिस्तानच्या भूमीवर प्रथमच कसोटी मालिका जिंकली होती. संघाच्या या विजयानंतर बांग्लादेश क्रिकेट संघावर पैशांचा पाऊस पडला आहे. बांग्लादेश सरकारने संघाला कोट्यावधी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

बांग्लादेशच्या अंतरिम सरकारने 14 सप्टेंबर रोजी बांग्लादेश राष्ट्रीय क्रिकेट संघाला BDT 3.2 कोटी (भारतीय रुपयांमध्ये 2.25 कोटी) दिले. बीसीबीअध्यक्ष फारुख अहमद यांनी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे सल्लागार असिफ महमूद यांच्याकडून बोनस स्वीकारला. तर त्यातील काही भाग पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दान केला जाईल. असे म्हटले जात आहे.  या कार्यक्रमाचा व्हिडिओ बांग्लादेश क्रिकेटच्या अधिकृत पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

रावळपिंडीत खेळले गेलेले दोन्ही कसोटी सामने बांग्लादेशने सहज जिंकले होते. पहिल्या सामन्यात बांग्लादेशने 10 गडी राखून विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात संघाने सहा गडी राखून विजय मिळवला होता. बांग्लादेशने पाकिस्तानला पहिल्यांदाच कसोटीत पराभूत केले नाही तर मालिकाही जिंकली. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत बांग्लादेशचा संघ चौथ्या स्थानावर आहे.

बांग्लादेश संघ आता भारताविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईत खेळवला जाईल, त्यानंतर दुसरा सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवला जाईल. यानंतर 6 ऑक्टोबरपासून टी-20 मालिका सुरू होईल. ज्यासाठी दोन्ही संघाची अधीच घोषणा देखील करण्यात आली आहे.

हेही वाचा-

जसप्रीत बुमराहकडे इतिहास रचण्याची संधी, केवळ 3 विकेट घेताच बनेल मोठा रेकॉर्ड!
बांग्लादेशने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा किती वेळा पराभव केला? कसोटी मालिकेपूर्वी पाहा रेकॉर्ड
मोठी बातमी! बांग्लादेश टी-20 मालिकेत हा स्टार फलंदाज संघाचा भाग नसणार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---