इंडियन प्रीमियर लीगचा अंतिम सामना रविवारी (२९ मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. साखळी फेरीतील ७० आणि प्लेऑफमधील ३ सामन्यांनंतर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांनी अंतिम सामन्यात स्थान पक्के केले. गुजरात आण राजस्थान दोन्ही संघांनी स्पर्धेत जबरदस्त प्रदर्शन करून चाहत्यांची मने जिंकली आहेत. अंतिम सामन्यात राजस्थानकडे दोन असे फलंदाज आहेत, जे गुजरातच्या फलंदाजी क्रमासाठी घातक ठरू शकतात.
गुजरात टायटन्साचा हा पहिला आयपीएल हंगाम आहे आणि त्यांनी पहिल्याच हंगामात उत्कृष्ट प्रदर्शन करून अंतिम सामना गाठला, तर राजस्थान रॉयल्स तब्बल १४ वर्षांनंतर अंतिम सामन्यात पोहोचला आहे. आयपीएलचा पहिला हंगाम म्हणजेच २००८ साली राजस्थानने शेन वॉर्नच्या नेतृत्वात विजेतेपद पटकावले होते. अशात त्यांच्यासाठी देखील ट्रॉफी जिंकण्याची संधी मोठ्या काळानंतर तयार झाली आहे.
राजस्थानला मधल्या मोठ्या काळामध्ये आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहोचता आले नव्हते, पण यावर्षी मेगा लिलावात त्यांनी दोन असे गोलंदाज खरेदी केले, ज्या जोडीने विरोधी संघांची चांगलीच फजिती केली. ही जोडी आहे फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (Ravichandra Ashwin) आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal).
राजस्थानला अंतिम सामन्यात पोहोचवण्यासाठी जोस बटलरचे योगदान नक्कीच सर्वात महत्वाचे आहे, पण या दोघांची भूमिका देखील महत्वपूर्ण राहिली आहे. राजस्थानच्या गोलंदाजांनी या हंगामात एकूण ९४ विकेट्स घेतल्या आहेत. त्यापैकी ३८ विकेट्स या फिरकी गोलंदाजांच्या जोडीने घेतल्या आहेत.
अनुभवी रविचंद्रन अश्विनने या हंगामात खेळलेल्या १६ सामन्यांमध्ये १२ विकेट्स घेतल्या आहेत. संघाला आवश्यकता असते, तेव्हा अश्विन अनेकदा त्याचे काम करून जातो. चहलच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर त्याने हंगामातील १६ सामन्यांमध्ये सर्वाधिक २६ विकेट्स घेतल्या आहेत.
आरसीबीचा वानिंदू सहरंगा आणि चहल यांनी प्रत्येकी २६ विकेट्स घेतल्या आहेत, पण चहल पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. हसरंगाचा स्ट्राईक रेट आणि इकोनॉमी चहलपेक्षा चांगली दिसते, पण अंतिम सामन्यात चहल त्याला मागे टाकून पर्पल कॅपचा मानकरी बनू शकतो.
चहल-अश्विन जोडीने आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये राजस्थानसाठी महत्वपूर्ण प्रदर्शन केले आहे आणि अंतिम सामन्यात देखील ते तसेच प्रदर्शन करतील, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. गुजरातच्या संघाला त्यांच्यापासून धोका असला, तरी त्यांच्याकडे देखील एक फलंदाज आहे, जो यो दोघांवर भारी पडू शकतो. दक्षिण आफ्रिकी दिग्गज डेविड मिलरने या हंगामात फिरकी गोलंदाजांविरोधात जबरदस्त प्रदर्शन केल आहे. अशात अंतिम सामन्यात मिलर अश्विन आणि चहलला कसे सामोरे जातो, हे पाहावे लागणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
IPL 2022 | जोस बटलरने पाडला षटकारांचा पाऊस, तर ‘या’ खेळाडूने मारला सर्वात लांब षटकार
गोलंदाजीसाठी ७ पर्याय ते फिनिशर्सची भरमार, ‘या’ ५ गोष्टी गुजरातला बनवू शकतात चॅम्पियन
IPL Final | विजेत्या-उपविजेत्या संघावरच नाही, तर पुरस्कार विजेत्या खेळाडूंवरही पडणार पैशांचा पाऊस