मुंबई इंडियन्स युवा खेळाडूंना संधी देणारा आणि त्यांना घडवणारा संघ म्हणून ओळखला जातो. मागच्या काही हंगामांमध्ये फ्रँचायझीने असे अनेक खेळाडू घडवले आहेत, जे पुढे जाऊन भारतीय संघाचा भाग बनले. परंतु सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मात्र अजूनही पदार्पणची संधी शोधत आहे. मुंबईचे प्रशिक्षक माहेला जयवर्धनेने अर्जुनच्या पदार्पणाविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई इंडियन्सला शुक्रवारी (६ मे) गुजरात टायटन्सविरुद्ध हंगामातील त्यांचा १० वा सामना खेळायचा आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला प्रशिक्षक माहेला जयवर्धनेने अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याच्या पदार्पणाच्या शक्यतेविषयी खास प्रतिक्रिया दिली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
माहेला जयवर्धने (Mahela Jayawardena) म्हणाला की, “मला वाटते की, प्रत्येकजन संघासाठी एक पर्याय आहे. गोष्टी पुढे कशा घडतात, ते आम्ही पाहू. ही मॅच-अपची गोष्ट आहे आणि सामना कसा जिंकता येईल याविषयी आहे. आमची प्राथमिकता हीच असेल की, आम्हाला योग्य मॅच-अप मिळेल.”
“प्रत्येक सामना ही, आत्मविश्वासाची गोष्ट आहे. आम्ही पहिला विजय मिळवण्यात यशस्वी झालो. हे एकत्र विजय मिळवणे आणि आत्मविश्वास पुन्हा मिळवण्याविषयी आहे. हे संघातील सर्वश्रेष्ठ लोकांविषयी आहे, जर अर्जुन त्यापैकी एक असेल, तर आम्ही नक्कीच त्याचा विचार करू. होय, पण हे सर्व व्यवस्थापनावर अवलंबून आहे,” असे जयवर्धने पुढे बोलताना म्हणाला.
दरम्यान, महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मागच्या आयपीएल हंगामापासून मुंबई इंडियन्सचा भाग आहे. मागच्या हंगामात त्याला पदार्पणाची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने त्याला पुन्हा संघात सहभागी केले. पहिल्या हंगामात मुंबईला अर्जुनसाठी २० लाख ही बेस प्राइस खर्च करावी लागली होती. पण यावर्षी मात्र दिल्ली कॅपिटल्समुळे त्याची किंमत वाढली. मुंबई अर्जुनला २० लाखात खरेदी करणार, तेवढ्यात दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यासाठी २५ लाखाची बोली लावली. परिणामी मुंबईला अर्जुनसाठी मेगा लिलावात ३० लाख खर्च करावे लागले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
जडेजाच्या खराब फॉर्मवर सीएसकेच्या प्रशिक्षकाची मोठी प्रतिक्रिया, संघात होऊ शकतो मोठा बदल
आता सगळं ‘रामभरोसे’! मुंबईपाठोपाठ चेन्नई देखील प्लेऑफ शर्यतीतून OUT, सीएसकेवर ही वेळ का आली?
‘त्यावेळी कोणीही माझ्यावर विश्वास दाखवला नाही’, आरसीबीच्या माजी कर्णधारानं मांडल्या आपल्या भावना