हार्दिकला मिळणार तेवतियाची साथ; अष्टपैलू म्हणतोय, ‘आता जबाबदारी घ्यावी लागेल’

हार्दिकला मिळणार तेवतियाची साथ; अष्टपैलू म्हणतोय, 'आता जबाबदारी घ्यावी लागेल'

आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स संघासाठी हा त्यांचा पहिलाच आयपीएल हंगाम आहे. गुजरात टायटन्सचा अष्टपैलू राहुल तेवतिया याने मंगळवारी (१५ मार्च) संघाच्या नियोजनाविषयी माहिती दिली. तेवतियाच्या मते कर्णधार हार्दिक पांड्या याला अधिक जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल.

गुजरात टायटन्सला आयपीएल २०२२च्या (IPL 2022)  अभियानाची सुरुवात २८ मार्चपासून लखनऊ सुपर जायंट्स (LSG) सोबतच्या सामन्याने करायची आहे. मेगा लिलावात गुजरात टायटन्सले राहुल तेवतिया (Rahul Tewatia) याच्यासाठी ९ कोटी रुपये खर्च केले आणि त्याला संघात सामील केले. तेवतिया आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) या अष्टपैलूंवर चांगले प्रदर्शन करण्याचा अधिक भार असणार आहे.

आगामी हंगामात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाच्या भूमिकेविषयी प्रश्न विचारण्यात आल्यार तेवतिया म्हणाला की, “भूमिका सारखीच राहील, जी  मध्यक्रमात असते. फलंदाजीच्या दृष्टीने मी आणि हार्दिक पांड्या संघात आहोत आणि आम्हाला खूप जबाबदारी घ्यावी लागेल. तसेच आम्हाला मुंबईत खेळायचे आहे आणि गोलंदाजीत आमच्या योजनेवर कायम राहावे लागणार आहे.”

तेवतियाच्या मते संघासाठी सहा, सात आणि आठ क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंची भूमिका महत्वाची असेल. तो म्हणाला की, “जसे की तुम्ही म्हणाला अष्टपैलूची भूमिका महत्वाची असते. सहा, सात आणि आठ क्रमांकावर खेळणाऱ्यांची भूमिका महत्वाची असते. त्यांच्याकडे प्रभाव सोडण्यासाठी कमी वेळ असतो आणि संधी अधिक असतात. ही भूमिका महत्वाची असते आणि आम्ही संघाला चांगल्या स्थितीत पोहोचवू शकतो.”

“जर आम्ही प्रथम फलंदाजी केली, तर शेवटच्या षटकांमध्ये जलद धावा बनवण्याचा प्रयत्न करू आणि जर आम्ही लक्ष्याचा पाठलाग करत असू, तेव्हा प्रयत्न असेल, संघाला लक्ष्यापर्यंत असे पोहोचवले जाईल आणि त्यानुसार प्रयत्न करत राहू,” असे तेवतियाने पुढे बोलताना सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

केरला ब्लास्टर्स तिसऱ्यांदा फायनलमध्ये; लीग शील्ड विजेत्या जमशेदपूरचे पॅकअप

सामन्यानंतर रोहित अश्विनबाबत म्हणाला ‘असे’ काही; मैदानावरच भावूक झाला दिग्गज फिरकीपटू, व्हिडिओ व्हायरल

अखेर मिस्टर आयपीएल सुरेश रैना दिसणार मैदानावर, मोठी अपडेट पुढे

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.