---Advertisement---

गुजरात टायटन्ससाठी खूशखबर! कॅप्टन हार्दिकला आयपीएल खेळण्यासाठी ग्रीन सिग्नल

Hardik-Pandya
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या मागील काही काळापासून त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत आहे. सध्या तो आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणून दिसणार आहे. त्याला या वर्षीच्या आयपीएल हंगामापुर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये यो-यो कसोटी द्यायची होती, ज्यानंतर त्याला आयपीएल खेळण्याची मंजूरी मिळणार होती. आता अशी चर्चा होत आहे की, एनसीएमध्ये पार पडलेली फिटनेस चाचणी तो चांगल्या पद्धतीने पास झाला आहे, ज्यामध्ये त्याने गोलंदाजी देखील उत्तम प्रकारे केली. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मर्यादित षटकांच्या फॉर्मेटच्या खेळाडूंच्या फिटनेसची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. कारण, यावर्षी भरपूर क्रिकेट सामने खेळले जाणार आहेत. ज्यामध्ये काही दिवसांपूर्वी अहमदाबाद फ्रँचायझीच्या शिबिरात सहभागी झालेल्या हार्दिक पंड्याच्या फिटनेसकडे सर्वांच्या नजरा आहेत. ज्यामध्ये आता त्याने ही फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे. जर तो हा आयपीएल हंगाम कोणत्याही दुखापती शिवाय खेळू शकला तर, तो भारतीय संघात पुनरागमन देखील करू शकतो.

बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, “मी प्रथम हे सांगू इच्छितो की, ही फिटनेस चाचणी अशा लोकांसाठी आहे जे दुखापतीतून परत येत आहेत. ज्यामध्ये आम्ही हार्दिकची सामान्य फिटनेस चाचणी केली. जेणेकरून आयपीएलपुर्वी सर्व गोष्टींची चाचणी घेता येईल. कारण तो खूप महत्त्वाचा खेळाडू आहे आणि म्हणूनच त्याची सध्याची फिटनेस चाचणी आम्ही केली आहे.”

फिटनेस चाचणीदरम्यान एनसीएच्या वैद्यकीय पथकाने हार्दिक पंड्याला गोलंदाजी करण्यास सांगितले नाही. मात्र, एक गोलंदाजी अष्टपैलु म्हणून त्याला आपला संपूर्ण फिटनेस सिद्ध करायचा होता. त्याने सुमारे १३५ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला. तो यो-यो चाचणी १७+ गुणांसह उत्तीर्ण झाला आहे.

बीसीसीआयच्या एका निवेदनात म्हटले आहे की, “हार्दिकला एनसीएमध्ये गोलंदाजी करण्याची आवश्यकता नव्हती. परंतु, तरीही त्याने १३५ च्या वेगाने गोलंदाजी केली. त्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी एनसीए येथे आयोजित केलेली यो-यो चाचणी १७+ गुणांसह उत्तीर्ण केली. जी आमच्या कटऑफ पातळीपेक्षा खुप जास्त आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया कसोटीनंतर ‘अशी’ आहे WTC गुणतालिका; भारतीय संघ…

‘चेन्नईचा चॅम्पियन’ ऋतुराज पोहोचला मुंबईत! संघाच्या आनंदाला उरला नाही पारावर

बाबो! रणजी ट्रॉफीत झारखंडची असाधारण कामगिरी, नागालँडवर तब्बल १००८ धावांची आघाडी; सामना मात्र..

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---