पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (PAK vs AUS) यांच्यात कराची येथील नॅशनल स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना खेळला. हा सामना अनिर्णित राहिला. कर्णधार बाबर आझमने ४२५ चेंडूत १९६ धावांची सर्वोत्तम खेळी खेळली आणि ६०७ मिनिटे क्रीजवर घालवली. तसेच मोहम्मद रिझवानने नाबाद १०४ आणि अब्दुल्ला शफीकने ९६ धावा केल्या. हा सामना अनिर्णित राहिल्यानंतरही ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघ आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप गुणतलिकेत (ICC World Test Championship Point Table) प्रथम दोन क्रमांकावर आहेत.
आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया ७१.४२ पीसीटीसह (गुणांची टक्केवारी) पहिल्या क्रमांकावर आहे. १६ मार्च २०२२ पर्यंत विश्व कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत २०२१-२०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाने चार सामने जिंकले आहेत आणि तीन अनिर्णित राहिले आहेत. संघाचे आता ६० गुण झाले आहेत. पाकिस्तान ६१.११ पीसीटीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचे ४४ गुण आहेत. संघाने आतापर्यंत तीन सामने जिंकले आहेत, दोन अनिर्णित खेळले आहेत आणि एक गमावला आहे.
दक्षिण आफ्रिका ६० पीसीटी आणि ३६ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ डब्लूटीसी २०२३ च्या पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यापूर्वी, भारतीय संघ पाचव्या स्थानावर होता. श्रीलंकन संघाची विजयाची टक्केवारी ५० इतकी कमी झाली. भारतीय संघ अजूनही ५८.३३ पीसीटी आणि ७७ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. १६ मार्च २०२२ पर्यंत डब्लूटीसी गुणतलिकेत २०२१-२०२३ मध्ये भारताने सहा सामने जिंकले आहेत, तीन गमावले आहेत आणि दोन अनिर्णित राहिले.
डब्लूटीसी २०२३ च्या गुणतालिकेत दोन विजयांसह श्रीलंका पाचव्या आणि न्यूझीलंड सहाव्या क्रमांकावर आहेत. बांगलादेश, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांना आतापर्यंत प्रत्येकी एकच विजय मिळाला आहे. इंग्लंड नवव्या क्रमांकावर आहे. त्यांच्यावर वेस्ट इंडिज आणि बांगलादेशचे संघ आहेत.
महत्वाच्या बातम्या –
दिल्ली कॅपिटल्सला धक्का! संघाचा हुकमी एक्का ‘पृथ्वी शाॅ’बाबत मोठी बातमी…
बाबो! रणजी ट्रॉफीत झारखंडची असाधारण कामगिरी, नागालँडवर तब्बल १००८ धावांची आघाडी; सामना मात्र..
लो जी हम आ गए! ‘यलो आर्मी’सोबत जोडला गेला जडेजा, सीएसकेने शेअर केला आगमनाचा Video