---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्सच्या नव्या खेळाडूंसह पाँटिंग रोज करतोय दोन वेळचं जेवण, ‘हे’ आहे कारण 

On: सोमवार, मार्च 21, 2022 1:39 PM
Chetan-Sakaria-Ricky-Ponting
---Advertisement---

आयपीएल २०२२ ची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. यावर्षीच्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने अनेक नवीन खेळाडूंना संघात सामील केले आहे. दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉंटिंगच्या मते संघातील वरिष्ठ खेळाडूंनी नव्याने सामील झालेल्या युवा खेळाडूंना मार्गदर्शन केले पाहिजे. तसेच तो स्वतः देखील खेळाडूंसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत.

मेगा लिलावापूर्वी आयपीएल फ्रेंचायझींना संघात चार खेळाडू रिटेन करण्याची संधी मिळाली होती. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने आयपीएल २०२२ (IPL 2022) साठी कर्णधार रिषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल आणि एन्रिच नॉर्किया यांना रिटेन केले होते, तर इतर सर्व खेळाडू हे मेला लिलावात खरेदी केले. ज्या खेळाडूंना संघाने रिटेन केले आहे, त्यांनी नवीन खेळाडूंना सहकार्य करणे अपेक्षित आहे.

खेळाडूंशी चांगले संबंध बनवण्यासाठी मुख्य प्रशिक्षक रिकी पॉंटिंग (Ricky Ponting) त्यांच्यासोबत वेळ घावण्याचा प्रयत्न करत आहे. याविषयी सांगताना तो म्हणाला की, “मी खेळाडूंना सांगितेल आहे की, जेव्हा तुम्ही स्वतःच्या खोलीत असाल, तेव्हा तुम्हाला दरवाजे उघडे ठेवा. एकमेकांना समजून घ्या. मी त्या सर्व युवा खेळाडूंसोबत नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण करत आहे, ज्यांना मी ओळखत नाही.”

संघात रिटने केलेल्या खेळाडूंची भूमिका स्पष्ट करताना पॉंटिंग म्हणाला, “जे खेळाडू काही काळापासून दिल्ली कॅपिटल्स संघात आहेत. नक्कीच त्यांची जबाबदारी आहे की, त्यांनी युवा खेळाडूंना मार्गदर्शन करावे.” रिकी पॉंटिंगने सांगितल्याप्रमाणे रिषभ पंत संघाचा कर्णधार आहे आणि तो त्याचे काम करणार आहे. परंतु पृथ्वी शॉ, अक्षर पटेल आणि नॉर्किया यांचीही संघात स्वतःची वेगळी भूमिका आणि जबाबदारी असेल.

पॉंटिंग संघासोबत त्याच्या पहिल्या सराव सत्रात सहभागी झाल्यावर खेळाडूंचा उत्साह पाहून आश्चर्यचकित झाला आहे. तो म्हणाला, “यावेळी आमचे लक्ष या गोष्टीवर आहे की, आम्ही आमच्या पहिल्या सामन्यासाठी तयार राहावे. खेळाडूंसोबत माझे पहिले सत्र चांगले राहिले.”

दरम्यान, आगामी हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या संघात डेविड वॉर्नर, मिशेल मार्श, टिम सेफर्ट आणि रोवमॅन पॉवेल हे विदेशी दिग्गज सहभागी आहेत. तसचे विक्की ओस्तवाल, चेतन साकरिया, यश धुल, सरफराज खान आणि कमलेश नागरकोटी या भारतीय युवा खेळाडूंचाही संघात सहभाग आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध २७ मार्चला होणाऱ्या सामन्याने दिल्ली कॅपिटल्स त्याच्या अभियानाची सुरुवात करेल.

महत्वाच्या बातम्या –

IPL 2022| सुरुवातीच्या षटकांमध्ये ‘हे’ पाच गोलंदाज प्रतिस्पर्धी संघांसाठी पडू शकतात महागात

आठवणीतील खेळी: कॅन्सरशी झुंज देत युवराजने १० वर्षांपूर्वी ठोकले होते ‘ते’ ऐतिहासिक शतक, पाहा व्हिडिओ

आयपीएल इतिहासातील एकमेव भारतीय गोलंदाज, ज्याने केलाय २ वेळा ५ विकेट्स घेण्याचा कारनामा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---