इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)२०२२च्या हंगामात राजस्थान रॉयल्सने शुक्रवारी (२७ मे) झालेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पराभूत करत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे रंगलेल्या या सामन्यात राजस्थानने बेंगलोरला सात विकेट्सने पराभूत करत तब्बल १४ वर्षानंतर अंतिम फेरी गाठली आहे.
या सामन्यात राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर याने पुन्हा एकदा वादळी शतकी खेळी करत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडली. त्याने आयपीएलच्या इतिहासात एकाच हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सनरायजर्स हैद्राबादच्या केन विलियमसन मागे टाकले. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या डेविड वॉर्नरचा विक्रम तोडण्यासाठी त्याला २४ धावांची आवश्यकता आहे.
विलियमसनने २०१८च्या आयपीएल हंगामात ७३५ धावा केल्या आहेत. तर बटलरने बेंगलोर विरुद्धच्या सामन्यात २० धावा करताच विलियमसनच्या विक्रमाला गवसणी घातली. वॉर्नरने २०१६च्या हंगामात हैद्राबादकडून खेळताना १७ सामन्यात ८४८ धावा काढल्या होत्या. तर या हंगामात बटलरने १६ सामन्यांत चार शतके आणि चार अर्धशतकांच्या मदतीने ८२४ धावा केल्या आहेत. यामुळे त्याला वॉर्नरचा विक्रम तोडण्यासाठी २४ धावांचीच गरज आहे.
तसेच या यादीत बेंगलोरचा विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे. त्याने २०१६मध्ये ८१.०८च्या सरासरीने १६ सामन्यांत ९७३ धावा काढल्या होत्या.
आयपीएलच्या इतिहासात एकाच हंगामात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज-
९७३ – विराट कोहली (२०१६)
८४८ – डेविड वॉर्नर (२०१६)
८२४ – जोस बटलर (२०२२)*
७३५ – केन विलियमसन (२०१८)
७३३ – ख्रिस गेल (२०१२)
७३३ – मायकल हसी (२०१३)
तसेच चालू हंगामात बटलरनेच सर्वाधिक असे ७८ चौकार आणि ४५ षटकार मारले आहेत. त्याने या हंगामातील पहिले शतक मुंबई इंडियन्स विरुद्ध ६८ चेंडूत ठोकले आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध ६१ चेंडूत १०३ धावा करत त्याने या आयपीएलमधील दुसरे शतक केले. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध त्याने ६५ चेंडूत ११६ धावा केल्या होत्या. तर बेंगलोर विरुद्ध ६० चेंडूत नाबाद १०६ धावा ठोकल्या आहेत.
आयपीएल २०२२चे जलद शतक हे रजत पाटीदार याने केले आहे. त्याने ४९ चेंडूमध्ये, तर बटलरने ५७ चेंडूत शतक केले आहे.
बेंगलोरकडून खेळताना पाटीदारने लखनऊ सुपर जायंट्स (२५ मे) विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात ४९ चेंडूमध्ये शतक केले होते. या सामन्यात त्याने ५४ चेंडूत नाबाद ११२ धावा केल्या होत्या. तर बटलरने दिल्ली कॅपिटल्स (२२ एप्रिल) विरुद्ध ५७ चेंडूत शतक केले होते.
या हंगामात सर्वोच्च धावा क्विंटन डी कॉक याने केल्या आहेत. त्याने लखनऊकडून खेळताना कोलकाता (१८ मे) विरुद्ध ७० चेंडूत नाबाद १४० धावा केल्या.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘असं वाटत होतं आम्ही कसोटी खेळतोय’, राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर आरसीबीच्या कर्णधाराचं वक्तव्य
‘हा भारतीय संस्कृतीचा महत्वाचा भाग’, डू प्लेसिसच्या शब्दांनी जिंकली कोट्यावधी भारतीयांची मनं






