आयपीएल फ्रेंचायझी कोलकाता नाइट रायडर्सचा सलामीवीर फलंदाज वेंकटेश अय्यर आयपीएल २०२२ मध्ये अद्याप स्वतःची छाप सोडू शकलेला नाहीय. असे असले तरी, त्याचे मागच्या आयपीएल हंगामात ज्या पद्धतीचे प्रदर्शन केले आहे, ते पाहता त्याला फ्रेंचायझी नक्कीच अजून संधी देईल. वेंकटेश मैदानात जेवढा मेहनती दिसतो, तो मैदानाबाहेर तेवढाच गमतीशीर स्वभावाचा आहे. त्याचे डब्लूडब्लूई (WWE) प्रती प्रेमही कोणापासून लपून राहिलेले नाहीय.
कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाने नुकताच त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांच्या सलामीवीर फलंदाज वेंकटेश अय्यर (venkatesh lyer) डब्लूडब्लूई सुपरस्टार अंडरटेकरची नक्कल करताना दिसत आहे. अंडरनेकरने अलीकडच्याच काळात डब्लूडब्लूईमधून निवृत्ती घेतली आहे. परंतु वेंकटेशने त्याची नक्कल करून चाहत्यांना पुन्हा एकदा त्याची आठवण करून दिली आहे.
कोलकाता नाइट रायडर्सने शेअर केलेल्या या व्हिडिओत वेंकटेश अय्यर त्याच्या फोटोग्राफरसोबत मस्ती करताना दिसत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, वेंकटेश त्याच्या फोटोग्राफरला अंडरटेकरचा सुप्रसिद्ध ‘चोकस्लॅम’ मारत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. पोस्टवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.
https://www.instagram.com/reel/Cb7VYOrAWj8/?utm_source=ig_web_copy_link
वेंकसटेश अय्यरने मागच्या आयपीएल हंगामात जबरदस्त प्रदर्शन केले होते आणि त्याच्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. हा त्याच्या कारकिर्दीतील पहिलाच आयपीएल हंगाम होता. परंतु २०२१ हंगामाच्या तुलनेत चालू आयपीएल हंगामात वेंकटेश पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसत आहे.
आयपीएल २०२२ मध्ये केकेआरने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि यामध्ये १६, १० आणि ३ अशा धावा केल्या आहेत. केकेआरला त्यांचा पुढचा सामना ६ एप्रिल रोजी खेळायचा आहे, ज्यामध्ये त्यांच्या समोर मुंबई इंडियन्सचे आव्हान असेल. हा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) स्टेडियम, पुणे याठिकाणी खेळला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
पंचांच्या निर्णयामुळे काव्या झाली होती उदास; पण पुढच्याच षटकात घडले असे काही की परतली स्माईल
धोनीच्या सीएसकेची दाणादाण उडवणारा पदार्पणवीर वैभव अरोरा, एकेकाळी क्रिकेटला ठोकणार होता रामराम
आयपीएल सोडून थेट ऑस्ट्रेलियात पोहोचला बुमराह! ‘त्या’ गोलंदाजाने सर्वांनाच पाडले बुचकळ्यात