मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील आठवा सामना शुक्रवारी (१ एप्रिल) होणार आहे. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात होणार आहे. कोलकाता संघाचा या हंगामातील हा तिसरा सामना आहे, तर पंजाबचा हंगामातील दुसरा सामना आहे. या हंगामात पंजाब ब गटात आहे, तर कोलकाता अ गटात आहे. त्यामुळे या हंगामातील साखळी फेरीत या दोन संघात हा एकमेव सामना होणार आहे.
दरम्यान, कोलकाताने आत्तापर्यंत खेळलेल्या २ सामन्यांपैकी पहिला सामना जिंकला आहे, तर दुसरा सामना पराभूत झाला आहे. तसेच पंजाबने खेळलेला एक सामना जिंकला आहे. त्यामुळे मयंक अगरवालच्या नेतृत्त्वाखाली खेळणारा पंजाब आपली विजयाची लय कायम राखण्याचा प्रयत्न करेल. तर कोलकाता विजयाच्या मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल.
असे असू शकतात संभावित संघ
तिसरा सामना खेळत असलेल्या कोलकाता संघाच्या संभावित ११ जणांच्या (KKR Predicted XI) संघाबद्दल बोलायचे झाल्यास ते फारसा बदल करण्याची शक्यता कमी आहे. पंजाबविरुद्ध देखील अजिंक्य रहाणे आणि वेंकटेश अय्यर सलामीला फलंदाजी करू शकतात. तर मधली फळी नितीश राणा, सॅम बिलिंग्ससह कर्णधार श्रेयस अय्यर सांभाळू शकतो. त्यांना यष्टीरक्षक शेल्डन जॅक्सनचीही साथ मिळेल.
अष्टपैलू म्हणून आंद्रे रसेल आणि सुनील नारायण संघात असू शकतील. पण तरी कोलताला रसेलच्या फिटनेसबद्दल चिंता असेल. तो जर पूर्ण फिट नसेल, तर कोलकाता मोहम्मद नबीला खेळवू शकतात. तसेच गोलंदाजीची जबाबदारी टीम साऊदी, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्तीच्या खांद्यावर असू शकते.
पंजाबच्या संभावित ११ जणांच्या संघाबद्दल (PBKS Predicted XI) बोलायचे झाल्यास ते देखील अंतिम ११ जणांमध्ये मोठा बदल करणार नसल्याचीच शक्यता दाट आहे. त्यांच्याकडून मयंक अगरवाल आणि शिखर धवन सलामीला फलंदाजी करू शकतात. तसेच भानुका राजपक्षे यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळण्याबरोबरच मधल्या फळीत फलंदाजी करू शकतो. त्याला अष्टपैलू लियाम लिव्हिंगस्टोन, राज बावा, शाहरुख खान आणि ओडियन स्मिथ यांची साथ मिळू शकते. त्याचबरोबर गोलंदाजी फळीची भिस्त हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, राहुल चाहर आणि संदीप शर्मा यांच्यावर सर्वाधिक असण्याची शक्यता आहे.
आमने-सामने कामगिरी
आयपीएमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स आत्तापर्यंत २९ सामन्यांत आमने सामने (KKR vs PBKS Head to Head) आले आहेत. यात कोलकाता संघाचे वर्चस्व सर्वाधिक राहिले आहे. कोलकाताने १९ सामने जिंकले आहेत. तर पंजाब संघाने १० सामने जिंकले आहेत. तसेच वानखेडे स्टेडियमवर अद्याप या दोन संघात एकही सामना झालेला नाही. त्यामुळे या मैदानावर या दोन संघांमध्ये होणारा हा पहिलाच सामना असेल.
हवामान आणि खेळपट्टी
हा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे (Wankhede Stadium). या मैदानावर या आयपीएल हंगामात खेळलेल्या पहिल्या दोन्ही सामन्यांत गोलंदाजांना मोठ्या प्रमाणात मदत मिळाली आहे. त्यामुळे शुक्रवारीदेखील खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल असू शकते. त्याचबरोबर दुसऱ्या डावात दवाचा परिणामही जाणवू शकतो.
मुंबईतील हवामान संध्याकाळी उष्ण आणि स्वच्छ राहिल. त्याचबरोबर तापमान ३० डिग्री सेल्सियसच्या आसपास असेल, तर हवेत ७४ टक्के आद्रता असेल.
आयपीएल २०२२ हंगामातील (IPL 2022) कोलकाता विरुद्ध पंजाब (KKR vs PBKS) सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध पंजाब सामना केव्हा होणार?
– आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध पंजाब सामना १ एप्रिल २०२२ रोजी खेळला जाणार आहे.
२. आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध पंजाब सामना कुठे खेळवला जाणार?
– आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध पंजाब सामना वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे खेळवला जाईल.
३. आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध पंजाब सामना किती वाजता सुरु होणार?
– आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध पंजाब सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्याकाळी ७.०० वाजता नाणेफेक होईल.
४. आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध पंजाब सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध पंजाब सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध पंजाब सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध पंजाब सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
पंजाब किंग्स संघ: मयंक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, भानुका राजपक्षे (यष्टीरक्षक), शाहरुख खान, ओडियन स्मिथ, राज बावा, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, संदीप शर्मा, राहुल चाहर, प्रभसिमरन सिंग, ऋषी धवन, बेनी हॉवेल, इशान पोरेल, वैभव अरोरा, अंश पटेल, अथर्व तायडे, प्रेरक मांकड, जितेश शर्मा, कागिसो रबाडा, वृतिक चॅटर्जी, बलतेज सिंग
कोलकाता नाईट रायडर्स संघ: अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्स, शेल्डन जॅक्सन (यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, सुनील नारायण, टीम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, शिवम मावी, मोहम्मद नबी, चमिका करुणारत्ने, बाबा इंद्रजीत, रिंकू सिंग, अनुकुल रॉय, प्रथम सिंग, अभिजीत तोमर, रसिक सलाम, अमन हकीम खान, अशोक शर्मा, रमेश कुमार.
महत्त्वाच्या बातम्या –
किस्से क्रिकेटचे – मैदानावर हत्ती आला आणि भारतीय संघाने इंग्लंडमध्ये विजयाचा श्रीगणेशा केला
किस्से क्रिकेटचे १३- भारत इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवत होता, कर्णधार मात्र आराम खुर्चीत…
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय