आयपीएल २०२२ च्या ६ व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात लढत झाली. या सामन्यात आरसीबीने ३ विकेट्स राखून विजय मिळवला. डी वाय पाटील स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजीसाठी अनुकूल असल्यामुळे फलंदाजांना जास्त मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दरम्यान केकेआरचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे महत्वाचा विक्रम करण्यापासून फक्त ६ धावांच्या अंतरावर असताना बाद झाला.
केकेआरचा सलामीवीर अजिंक्य राहाणे (Ajinkya Rahane) आरसीबी विरुद्धच्या या सामन्यात अवघ्या ९ धावा करून बाद झाला. स्वस्तात बाद झाल्यामुळे रहाणे एका महत्वाच्या यादीत सहभागी होऊ शकला नाही. जर त्याने या सामन्यात अजून ६ धावा केल्या असत्या, तर आयपीएमध्ये ४ हजार धावा करणारा फलंदाज बनला असता. अशात तो विराट कोहली, रोहित शर्मा आणि एमएस धोनीसारख्या दिग्गजांच्या यादीतही सहभागी होऊ शकत होता. असे असले तरी, पुढच्या सामन्यात त्याच्याकडे हा विक्रम करण्याची संधी आहे. रहाणे आयपीएलमध्ये हा विक्रम करणारा जगातील १२ वा खेळाडू बनेल.
आरसीबीविरुद्धच्या या सामन्यापूर्वी त्याच्या नावावर १५२ आयपीएल सामन्यांतील १४२ डावांमध्ये ३९८५ धावांची नोंद होती. आता त्याच्या नावावर आयपीएलमध्ये ३९९४ धावांची नोंद आहे.
आयपीएल २०२२ च्या पहिल्या सामन्यात रहाणेने सीएसेकेविरुद्ध ४४ धावांची महत्वाची खेळी केली होती. या सामन्यातही त्याने हळुवार सुरुवात केली. डावाच्या चौथ्या षटकात आकाश दीप गोलंदाजी करत होता आणि त्यावेळी त्याने पहिला चौकार मारला. वैयक्तिक ४ हजार आयपीएल धावांपासून अवघ्या ६ धावांच्या अंतरावर असताना मोहम्मद सिराजने त्याला झेलबाद केले.
आयपीएलमध्ये ४ हजारपेक्षा अधिक धावा करणारे खेळाडू
- विराट कोहली: ६३२४ धावा (केकेआरविरुद्धच्या सामन्याआधी)
- शिखर धवन: ५८२७ धावा
- रोहित शर्मा: ५६५२ धावा
- सुरेश रैना: ५५२८ धावा
- डेविड वॉर्नर: ५४४९ धावा
- एबी डिविलियर्स: ५१६२ धावा
- क्रिस गेल: ४९६५ धावा
- एमएस धोनी: ४७९६ धावा
- रोबिन उथप्पा: ४७५० धावा
- गौतम गंभीर: ४२१७ धावा
- दिनेश कार्तिक: ४०७८ धावा
दरम्यान सामन्याचा विचार केला तर आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने १२८ धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने ७ विकेट्सच्या नुकसानावर आणि १९.२ षटकात लक्ष्य गाठले आणि सामना नावावर केला.
महत्वाच्या बातम्या –
आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा झाली ‘ही’ कमाल, दोन्हीवेळी केकेआर आरसीबीच्या गोलंदाजांची शिकार
सचिनची २१ वर्षांपुर्वी पुण्यात १० हजार वनडे धावा करण्याची हुकली होती संधी