इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या मेगा लिलावात अनसोल्ड राहिलेल्या ऍरॉन फिंचने अखेर चालू हंगामातील पहिला सामना खेळला. इंग्लंडच्या ऍलेक्स हेल्सने आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर फिंचच्या रूपात कोलकाता नाईट रायडर्सला एक चांगला फलंदाज मिळाला होता. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शुक्रवारी (१५ एप्रिल) हंगामातील पहिला सामना खेळला. हा सामना खेळण्यासाठी मैदानात पाय टाकताच फिंचने मोठा विक्रम नावावर केला आहे.
ऍरॉन फिंचकडे आयपीएलमध्ये खेळण्याचा मोठा अनुभव आहे. तसेच आयपीएल २०२२ (IPL 2022) सुरू होण्यापूर्वी खेळल्या गेलेल्या टी२० विश्वचषकात त्याने ऑस्ट्रेलियाने विजेतेपद मिळवून दिले आहे. असे असले तरी, आयपीएलच्या मेगा लिलावात त्याला खरेदी करण्याचे धाडस कोणत्याच फ्रँचायझीने दाखवले नव्हते. इंग्लडच्या ऍलेक्स हेल्सला मेगा लिलावात केकेआरने खरेदी केले होते, पण त्याने अचानक माघार घेतल्यानंतर ऍरॉन फिंच (Aaron Finch) याला संघाने बदली खेळाडूच्या रूपात सहभागी केले. फिंचसाठी केकेआरने १ कोटी ५० लाख रूपये मोजले. फिंचसाठी केकेआर त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील ९वा संघ ठरला आहे, ज्याच्यासोठी तो खेळला.
केकेआरमध्ये सहभागी होण्यापूर्वी फिंच तब्बल ८ आयपीएल संघांचे प्रतिनिधित्व करून आला आहे. त्याने २०१०मध्ये राजस्थान रॉयल्ससोबत आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर २०११-१२मध्ये दिल्ली डेअरडेविल्स, २०१३मध्ये पुणे वारिअर्स, २०१४मध्ये सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व केले. पुढे २०१५मध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळला, २०१६-१७मध्ये गुजरात टायटन्स, २०१८मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब, २०२०मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळला. या संपूर्ण प्रवासानंतर फिंचची गाडी आता कोलकाता नाईट रायडर्सवर येऊन थांबली आहे. केकेआरसाठी तो कसे प्रदर्शन करतो, ते पाहावे लागणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
फिंचकडे आयपीएलचा दांडगा अनुभव आहे. मागच्या हंगामापर्यंत त्याने खेळलेल्या ८७ आयपीएल सामन्यांतील ८५ डावात २५.३८च्या सरासरीने २००५ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त फिंचच्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने ८८ सामने खेळले आणि यामध्ये ३४.४४च्या सरासरीने २६८६ धावा केल्या आहेत.
ऍरॉन फिंचने प्रतिनिधित्व केलेले आयपीएल संघ
२०१० – राजस्थान रॉयल्स
२०११-१२ – दिल्ली कॅपिटल्स
२०१३ – पुणे वारिअर्स
२०१४ – सनराझर्स हैदराबाद
२०१५ – मुंबई इंडियन्स
२०१६-१७ – गुजरात लायन्स
२०१८ – किंग्ज इलेव्हन पंजाब
२०२० – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
२०२२ – कोलकाता नाइट रायडर्स*
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
चहलच्या पत्नीचा ‘बीहू’ डान्स ठरतोय लक्षवेधी; सोबत रियान परागनेही लावले ठुमके, व्हिडिओ जोरदार व्हायरल
‘मुंबई इंडियन्स अजूनही चॅम्पियन आहे…’ पत्रकाराच्या प्रश्नावर सूर्यकुमार यादवचे सडेतोड प्रत्युत्तर