बीसीसीआयने रविवारी (६ मार्च) आयपीएल २०२२ साठी वेळापत्रकाची घोषणा केली. यावर्षी दोन नवीन फ्रेंचायझी आयपीएलमध्ये सहभागी झाल्यामुळे सामन्यांची संख्या आणि स्पर्धेचा कालवधी वाढला आहे. यावर्षी आयपीएल लीग स्टेजमध्ये एकूण ७० सामने खेळले जातील आणि स्पर्धा ६५ दिवस चालणार आहे. सर्व सामने मुंबई आणि पुण्यामधील चार स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्याने स्पर्धेची सुरुवात होईल.
आयपीएल स्पर्धा २६ मार्चला सुरू होणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात होईल. हा सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियममध्ये (Wankhede Stadium) खेळला जाईल. त्यानंतर सीएसकेला दुसरा सामना लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळायचा आहे, जो ३१ मार्चला ब्रेबॉन स्टेडियममध्ये होईल. संघ तिसरा सामना ३ मार्चला पंजाब किंग्जविरुद्ध खेळेल.
आयपीएल २०२२ मधील सीएसकेचे वेळापत्रक
सीएसके विरुद्ध केकेआर – २६ मार्च – वानखडे स्टेडियम
सीएसके विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स – ३१ मार्च – ब्रेबॉर्न स्टेडियम
सीएसके विरुद्ध पंजाब किंग्ज – ३ एप्रिल – ब्रेबॉर्न स्टेडियम / (दुसरा सामना) २५ एप्रिल – वानखडे स्टेडियम
सीएसके विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – ९ मार्च – डीवाय पाटील स्टेडियम / १ मे – एमसीए स्टेडियम
सीएसके विरुद्ध आरसीबी – १२ एप्रिल – डीवाय पाटील स्टेडियम / ४ मे – एमसीए स्टेडियम
सीएसके विरुद्ध गुजरात टायटन्स – १७ एप्रिल – एमसीएस स्टेडियम / १५ मे – वानखडे स्टेडियम
सीएसके विरुद्ध मुंबई इंडियन्स – २१ एप्रिल – डीवाय पाटील स्टेडियम / १२ मे – वानखडे स्टेडियम
सीएसके विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – ८ मे – डीवाय पाटील स्टेडियम
सीएसके विरुद्ध राजस्थान रॉयल्स – २० मे – ब्रेबॉर्न स्टेडियम
दरम्यान, आयपीएलच्या मेगा लिलावात चेन्नई सुपर किंग्ज नवीन खेळाडूंना पैसा खर्च करताना दिसला नाही. सीएसके संघ शक्यतो त्यांच्या जुन्याच खेळाडूंवर बोली लावताना दिवसा. चेन्नईने वेगवान गोलंदाज दीपक चाहरवला सर्वाधिक बोली लावून विकत घेतले होते, पण तो फिटनेसच्या कारणास्तव स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यांसाठी उपस्थित राहू शकणार नाही, अशी माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या –
आर्यन पम्प्स एमएसएलटीए १५०००डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत सहजा यमलापल्ली हिला विजेतेपद
आयपीएल २०२२ वेळापत्रकात ‘या’ तारखेला होणार रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे सामने, वाचा सविस्तर