---Advertisement---

‘श्रेयस अय्यरकडे क्रिकेटचा सुपरस्टार होण्याचे गुण’, दिग्गज कर्णधाराने गायले गुणगान

On: शनिवार, मार्च 26, 2022 3:41 PM
Shreyas-Iyer
---Advertisement---

कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमने शुक्रवारी (२५ मार्च) त्यांच्या संघाचा नवीन कर्णधार श्रेयस अय्यर याचे तोंड भरून कौतुक केले आहे. मॅक्युलमच्या मते श्रेयस अय्यरमध्ये फलंदाजीचे सर्व गुण आहेत आणि तो केकेआरसाठी दशकातील सर्वोत्तम खेळाडू बनू शकतो.

आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात श्रेयस अय्यरला खरेदी करण्यासाठी केकेआर (कोलकाता नाइट रायडर्स) फ्रेंचायझीने १२.२५ कोटी रुपये खर्च केले. केकेआरचा प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम (Brendon McCullum) याच्या मते श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) एक गुणवंत खेळाडू आहे.

मॅक्युलम म्हणाला की, “तो केकेआरचा दशकातील सर्वश्रेष्ठ खेळाडू बनू शकतो. आम्हाला कुठुनतरी सुरुवात करायचीच आहे आणि ती उद्या असेल. जगभरात त्याला आदर मिळतो आणि आता त्याचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन येणे बाकी आहे. त्याच्याकडे खेळाचा सुपरस्टार बनण्याचे गुण आहेत आणि मी त्याच्यासोबत काम करण्यासाठी आतूर आहे.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---