मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर बुधवारी (१८ मे) अंगावर शहारे आणणारा सामना पाहायला मिळाला. या दिवशी लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमने सामने होते. लखनऊने अवघ्या २ धावांनी हा सामना जिंकला आणि प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले. प्रथम फलंदाजी करताना लखनऊच्या केएल राहुल आणि क्विंटन डी कॉकने मैफिल लुटली, तर प्रत्युत्तरात केकेआरच्या प्रत्येक खेळाडूने संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या षटकात जो थरार चाहत्यांना अनुभवायला मिळाला, तो खरोखर अविस्मरणीय होता.
प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्सने एकही विकेट न गमावता २१० धावा केल्या आणि केकेआरला विजयासाठी २११ धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात केकेआरच्या सलामीवीरांनी स्वस्तात विकेट्स गमावल्या, पण त्यानंतर प्रत्येक खेळाडूने महत्वाचे योगदान दिले. दुसऱ्या डावात चर्चा झाली, ती केकेआरचा रिंकू सिंग आणि लखनऊच्या एविन लुईस (Evin Lewis) यांची.
लखनऊने प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभी केली असली, तर रिंकू सिंगने लखनऊसाठी हा सामना घाईला आणला होता. त्याने अवघ्या १५ चेंडूत ४० धावा केल्या होत्या आणि संघाला विजय मिळवून देण्याच्या मानसिकतेसह खेळत होता. परंतु शेवटच्या षटकात एविन लुईसने त्याचा जबरदस्त झेल पकडला आणि सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटवले.
https://twitter.com/Akashpatel233/status/1526994082018775041?s=20&t=Ln2CT_nue7C7tecQWBGApw
https://twitter.com/mr_rajvaniya/status/1526995724574916608?s=20&t=Ln2CT_nue7C7tecQWBGApw
https://twitter.com/AvengerReturns/status/1526992328782581760?s=20&t=Ln2CT_nue7C7tecQWBGApw
शेवटच्या दोन चेंडूत केकेआरला तीन धावांची आवश्यकता होती. त्यावेळी स्ट्रईकवर रिंकू सिंग होता आणि मार्कस स्टॉईनिस गोलंदाजी करत होता. मैदानात तनावपूर्ण वातावरण होते आणि अशात रिंकूने षटकातील या पाचव्या चेंडूवर मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला. रिंकू तोपर्यंत खेळपट्टीवर जरी सेट झाला असला, तर दबावाच्या परिस्थितीत तो शॉट त्याला नीट मारता आला नाही आणि लुईसने संधी साधली. चेंडू हवेत असताना लुईस धावत आला आणि शेवटच्या क्षणी एका हातात हा झेल पकडला.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
लुईसने झेल पडकल्यानंतर लखनऊच्या डगआऊटमध्ये सामना जिंकल्यासारखा जल्लोष केला गेला. त्यावेळी संघ जिंकला नसला, तरी हा झेल घेणे म्हणजे सामना जिंकल्यासारखेच होते. प्रशिक्षक गौतम गंभीर आणि इतर सर्व संघ रिंकूची विकेट मिळाल्यानंतर अतिशय उत्साहात दिसले. त्यांचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अफलातून! शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यात लखनऊचा २ धावांनी विजय, प्लेऑफसाठी मिळवली पात्रता
अजून कोणाकडून नव्हे तर ‘अंपायर’कडून उमरान मलिक शिकलाय ‘पंच सेलिब्रेशन’ची स्टाईल
गेल, मॅक्यूलम सारखंच क्विंटन डिकाॅक हे नाव पण आदरानेच घ्या, कारण भावाने रेकॉर्डच तसा केलाय!






