आयपीएलच्या मैदानात बुधवारी (१८ मे) क्विंटन डी कॉक आणि केएल राहुलने लखनऊ सुपर जायंट्ससाठी नाबाद २१० धावंची भागीदारी केली. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या या सामन्यात लखनऊने एकही विकेट न गमावता या धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील ही सलामीवीरांची सर्वात मोठी भागीदारी ठरली. राहुल आणि डी कॉकने डेविड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टोचा विक्रम मोडीत काढला आहे.
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत एकदाही सलामीवीर जोडीने नाबाद २०० धावा केल्या नव्हत्या. ही पहिली वेळ आहे, जेव्हा एखाद्या सलामीवीर जोडीने आयपीएलच्या सामन्यात नाबाद २०० धावांची भागीदारी साकारली आहे. तसेच हे दोघे पहिली अशी जोडी बनले आहेत, ज्यांनी सामन्यातील सर्वच्या सर्व २० षटके नाबाद खेळून काढले आहेत. यापूर्वी अनेक मोठ्या भागीदाऱ्या झाल्या, पण त्यापैकी एकानेही सर्वच्या सर्व २० षटके खेळून काढली नव्हती.
आयपीएलमध्ये यापूर्वी डेविड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो या सलामीवीर जोडीच्या नावावर सर्वात मोठी भागीदारी होती. या दोघांनी मिळून आरसीबीविरुद्ध २०१९ साली १८५ धावा केल्या होत्या. आता आता या यादीत डी कॉक आणि राहुल पहिल्या क्रमांकावर आले आहेत, ज्यांनी नाबाद २१० धावा साकारल्या आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर गौतम गंभीर आणि नाथन लायन या सलामीवीर जोडीचे नाव आहे. चौथ्या क्रमांकावर आहे केएल राहुल आणि मयंक अगरवाल जोडी. यादीत पाचव्या क्रमांकावर ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे जोडी आहे.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या भागीदाऱ्या
२१०* – केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक (२०२२)
१८५ – डेविड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो (२०१९)
१८४* – गौतम गंभीर आणि नाथन लायन (२०१७)
१८३ – केएल राहुल आणि मयंक अगरवाल (२०२०)
१८२ – ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे (२०२२)
दरम्यान, उभय संघातील या सामन्याची नाणेफेक लखनऊने जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीरांनी हा निर्णय अगदी योग्य ठरवला. डी कॉकने ७० चेंडूत २००.०० च्या स्ट्राईक रेटसह १४० धावा उभ्या केल्या. तर केएल राहुलने ५१ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६८ धावा केल्या. टिम साउदी केकेआरसाठी सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने टाकलेल्या ४ षटकात १४.२५ च्या इकोनॉमीने ५७ धावा खर्च केल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
केन विलियम्सच्या अनुपस्थितीत ‘हे’ तीन खेळाडू सांभाळू शकतात सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्त्वपद
भारी क्षण! डी कॉकचा धमाका पाहिल्यानंतर कुटुंबीयांसाठी झाले आभाळ ठेंगणे, मैदानातून पाहात होते सामना
क्लास क्लास क्लास…! क्विंटन डी कॉकचे केकेआरविरुद्ध अवघ्या ५९ चेंडूत शतक