सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघ आयपीएल २०२२च्या २०व्या सामन्यात आमने-सामने होते. नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणारा लखनऊ संघ प्रत्युत्तरात लक्ष्य गाठू शकला नाही आणि राजस्थानने ३ धावांनी विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने सामन्यात स्वतःच्या संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आणि सामनावीर देखील ठरला. यासोबत चहल आयपीएलच्या इतिहासात दुसरा सर्वात जलद १५० विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे.
राजस्थान रॉयल्सच्या युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने लखनऊविरुद्धच्या या सामन्यात ४ षटके गोलंदाजी केली. यामध्ये चहलने ४१ धावा खर्च केल्या आणि ४ विकेट्स नावावर केल्या. चहलने लखनऊचा सलामीवीर क्विंटन डी कॉक, महत्वाचा फलंदाज आयुष बदोनी, अष्टपैलू कृणाल पंड्या आणि गोलंदाज दुष्मंथा चमीरा यांच्या विकेट्स घेतल्या. यादरम्यान चहलने आयपीएल कारकीर्दीतील वैयक्तिक १५० विकेट्स पूर्ण केल्या, ते देखील अवघ्या ११८ सामन्यांमध्ये.
@yuzi_chahal starred with the ball & bagged the Player of the Match award as @rajasthanroyals sealed a win over #LSG. 👏 👏#TATAIPL | #RRvLSG pic.twitter.com/RbIp5txjUz
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2022
आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान १५० विकेट्सचा टप्पा ओलांडण्याची कामगिरी श्रीलंकन दिग्गज लसिथ मलिंगा याने केली आहे. मलिंगाने अवघ्या १०५ आयपीएल सामन्यांमध्ये वैयक्तिक १५० विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर ११८ सामन्यांसह या यादीत युजवेंद्र चहल दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर ड्वेन ब्रावो आहे, ज्याने १३७ आयपीएल सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आमित मिश्रा आहे, ज्याने १४० सामन्यात १५० आयपीएल विकेट्स घेतल्या आहेत.
पाचव्या क्रमांकावर पीयुष चावला आहे, ज्याने १५० आयपीएल विकेट्स घेण्यासाठी १५६ सामने खेळळे आहेत. सहाव्या क्रमांकावर आहे हरभजन सिंग, ज्याने १५९ आयपीएल सामन्यांमध्ये वैयक्तिक १५० विकेट्स घेतल्या होत्या.
सामन्याचा विचार केला, तर लखनऊचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने ६ विकेट्सच्या नुकसानावर १६५ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊ संघ ८ विकेट्सच्या नुकसानावर १६२ धावा करू शकला. परिणामी राजस्थानने ३ धावांनी विजय मिळवला.
आयपीएलमध्ये सर्वात वेगवान १५० विकेट्स घेणारे गोलंदाज
१०५ सामने- लसिथ मलिंगा
११८ सामने- युझवेंद्र चहल*
१३७ सामने- ड्वेन ब्रावो
१४० सामने- अमित मिश्रा
१५६ सामने- पीयुष चावला
१५९ सामने- हरभजन सिंग
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
केएल राहुल आला, बोल्टने पाहिला अन् थेट तंबूतही धाडला, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, ‘झक्कास’