आयपीएल २०२२ (IPL 2021) मध्ये नव्याने सामील होणार्या लखनऊ फ्रेंचायझीने (Lucknow ipl team) सोशल मीडियावर स्वतःची उपस्थिती दाखवायला सुरुवात केली आहे. फ्रेंचायझीने नुकतेच त्यांच्या सपोर्ट स्टाफची घोषणा केली. तसेच आयपीएलच्या पुढच्या हंगामापूर्वी होणाऱ्या मेगा लिलावाआधी संघ त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंचीही माहितीही लवकरच देईल. तत्पूर्वी, फ्रेंचायझीला त्यांचे नाव देखील निश्चित करायचे आहे. फ्रेंचायझीने सोशल मीडियावर चाहत्यांना यासाठी सल्ले मागितले आहेत.
काही दिवसांपूर्वी संजीव गोयंकांच्या आरपी-एसजी समुहाने लखनऊ फ्रेंचायझीला ७०९० करोड रुपयांमध्ये विकत घेतले. फ्रेंचायझी सध्या फक्त लखनऊ नावाने ओळखली जात आहे. परंतु त्यांना संघाचे अंतिम नाव लवकरच निश्चित करावे लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर फ्रेंचायझीने काम सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. फ्रेंचायझीने नाव निश्चित करण्यासाठी अनोखा मार्ग वापरला आहे. त्यांनी ट्वीटर खात्यावरून चाहत्यांकडे संघाचे अंतिम नाव निश्चित करण्यासाठी मदत मागितली आहे. चाहत्यांसोबत जोडले जाण्यासाठी फ्रेंचायझीला याचा नक्कीच फायदा होईल, तसेच यादरम्यान फ्रेंचायझीला एखादे चांगले नाव सापडण्याची देखील शक्यता आहे.
फ्रेंचायझीने बुधवारी (५ जानेवारी) स्वतःच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून एक पोस्ट करून चाहत्यांना संघासाठी नाव सुचवण्यास सांगितले आहे. पोस्टमध्ये प्रसिद्ध इंग्रजी नाटककार आणि कवि विलियम शेक्सपीयरचा उल्लेख करून लिहिले आहे की, ‘शेक्सपीयरचे ऐकू नका, नावात सर्वकाही आहे आणि आम्ही एका नवीन नावाची वाट पाहत आहोत.’
Don't listen to Shakespeare. There's everything in a name, and we're waiting for one. 😉
Participate now: https://t.co/e8Rl5sZMCC#NaamBanaoNaamKamao #TeamLucknow #IPL #IPL2022 pic.twitter.com/J87UwKJWRA
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) January 5, 2022
दरम्यान, लखनऊ फ्रेंचायझीने भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज गौतम गंभीर याला संघाच्या मेंटरपदी नियुक्त केले आहे. तसेच झिम्बाब्वेचे माजी कर्णधार ऍण्डी फ्लावर यांच्याकडे संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भारताचे माजी खेळाडू विजय दहिया यांनाही आयपीएल २०२२ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी बुधवारी संघाच्या सहायक प्रशिक्षकाच्या रूपात नियुक्त केले गेले आहे. ४८ वर्षीय दहिया सध्या उत्तर प्रदेश संघाचे प्रशिक्षक आहेत. तसेच यापूर्वी त्यांनी आयपीएलमध्ये दोन वेळा जेतेपद मिळवलेल्या कोलकाता नाइट रायडर्सच्या सहायक प्रशिक्षकपदी काय केले आहे.
महत्वाच्या बातम्या –
झुलन गोस्वामीच्या भूमीकेत अनुष्का शर्माचा जलवा! ‘चकदा एक्सप्रेस’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
विराट कोहली तिसऱ्या कसोटीतूनही होणार बाहेर? वाचा काय म्हणाला चेतेश्वर पुजारा
लेकीच्या वाढदिवशी सुरू होणाऱ्या कसोटीपूर्वी विराटची जोरदार तयारी, व्हिडिओ भन्नाट व्हायरल
व्हिडिओ पाहा –