इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या हंगामात अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. यावर्षी १० फ्रॅंचायझी सहभागी असल्यामुळे आयपीएलचे स्वरूप सुद्धा बदलण्यात आले आहे. तसेच, लिलावात अनेक खेळाडू आपल्या जुन्या फ्रॅंचायझीपासून वेगळे झाले आहेत. काही खेळाडूंनी आपल्या जुन्या फ्रॅंचायझीसोबत दिसत आहेत. या खेळाडूंवर टीका केली जात आहे की, त्यांनी आपला सुवर्णकाळ पूर्ण केला आहे, त्यामुळे ते जास्त रेटचे खेळाडू आहेत, ज्यांच्यावर फ्रॅंचायझी विनाकारण त्यांच्यावर विश्वास ठेवत आहेत. यामधील काही खेळाडूंवर त्यांच्या वयामुळे, तर काहींवर मागील खराब कामगिरीमुळे टीका होत आहे, परंतु त्यांची खेळी उल्लेखनीय आहे.
या लेखात आपण अशा खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी आयपीएल २०२२च्या पहिल्या ४ सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला नाही, परंतु शानदार खेळी करून दाखवून दिले आहे की, ते अजूनही चांगली कामगिरी करून संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.
१. एमएस धोनी (CSK)
आयपीएल सुरू होण्याच्या दोन दिवस अगोदर एमएस धोनीने (MS Dhoni) कर्णधार पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सीएसकेने रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) संघाचा कर्णधार बनवला. तो यावेळी एक यष्टीरक्षक- फलंदाज म्हणून आयपीएल खेळत आहे. सीएसकेने आपला पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळला. या सामन्यात धोनीने संघाला विजय मिळवून दिला नसला, तरी धडाकेबाज खेळी करत संघाला संकटातून बाहेर काढले. तो जेव्हा मैदानात आला, तेव्हा संघ कठीण काळातून जात होता. तो मैदानात आल्याने सोशल मीडियावर प्रचंड टीका केल्या जात होत्या, परंतु त्याने उत्तम खेळी करत दाखवून दिले की, तो अजूनही सर्वोत्तम खेळी खेळू शकतो. त्याने ३८ चेंडूत ७ चौकारांच्या आणि १ षटकाराच्या मदतीने ५० धावा केल्या. त्याने या सामन्यात १३१.५८च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली.
२. ड्वेन ब्रावो (CSK)
चेन्नई संघाला ‘डॅडी आर्मी’ सुद्धा म्हणले जाते. यामध्ये ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) सुद्धा एक आहे. या हंगामात संघाने जेव्हा ब्रावोला रिटेन केले, तेव्हा सोशल मीडियावर असे मिम्स व्हायरल होत होते की, संघाला आता ब्रावोपासून पुढे जाऊन संघाच्या भविष्याबद्दल विचार केला पाहिजे. त्याने कोलकाताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ४ षटकांत ३ विकेट्स घेतल्या. यामध्ये व्यंकटेश अय्यर, नीतिश राणा आणि सॅम्स बिलिंग्स या खेळाडूंचा समावेश होता.
३. कुलदीप यादव (DC)
कुलदीप यादवची (Kuldeep Yadav) मागील काही हंगामातील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. हा खेळाडूचा कठीण काळ सुरू होता. या फिरकी गोलंदाजाला दिल्ली कॅपिटल्स संघात संधी मिळाली होती. मात्र, प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली नाही. या हंगामात त्याला रिषभ पंतने कुलदीपला संधी दिली आणि त्याने या हंगामात मुंबई इंडियन्सविरुद्ध रोहित शर्मा, अनमोलप्रीत सिंग आणि कायरन पोलार्ड या खेळाडूंच्या विकेट्स घेतल्या. त्याने या सामन्यात फक्त १५ धावा देत ३ विकेट्स घेतल्या आहेत.
४. मोहम्मद शमी (GT)
टी२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाला पहिल्यांदाच पराभूत केले होते, तेव्हा मोहम्मद शमीला (Mohammed Shami) सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. यावेळी पाकिस्तानने भारताला १० विकेट्सने पराभूत केले होते, तेव्हा त्याच्यावर होणाऱ्या टीकांना विराट कोहलीने (Virat Kohli) उत्तर दिले होते. शमी या हंगामात गुजरात संघाकडून खेळत असून त्याने पहिल्या सामन्यात ३ खेळाडूंच्या विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये कर्णधार केएल राहुल, क्विंटन डी काॅक आणि मनीष पांडे या खेळाडूंचा समावेश आहे.
मंगळवारी (२९ मार्च) हैदराबाद आणि राजस्थान संघात ५वा सामना पार पडणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘अजेय’ ऑस्ट्रेलियाचं सेमीफायनलमध्ये बिघडणार गणित? स्टार अष्टपैलू महत्त्वपूर्ण सामन्यातून बाहेर
डिविलियर्सचा ‘तो’ व्हॉईस मॅसेज ऐकून कोहली झाला होता भावूक, सांगितला इमोशनल किस्सा
“आमच्यासाठी तोच बेबी एबी”, केएल राहुलकडून २२ वर्षीय भारतीय युवा खेळाडूचे कौतुक