मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ स्पर्धेत शनिवारी (९ एप्रिल) डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) असणार आहेत. या दिवसातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात खेळवला जाणार आहे. हे दोन्ही संघ यंदाच्या हंगामात ब गटात असल्याने साखळी फेरीतील या दोन संघांचा एकमेकांबरोबरचा हा पहिला सामना आहे. यानंतर १ मे रोजी देखील हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत.
या हंगामात चेन्नईने आत्तापर्यंत ३ सामने खेळले आहेत, तर हैदराबादने २ सामने खेळले आहेत. या दोन्ही संघांनी त्यांनी खेळलेल्या एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे शनिवारी या दोन्ही संघांपैकी एका संघाला हंगामातील पहिला विजय मिळणार हे निश्चित आहे.
असे असू शकतात संभावित संघ
चारवेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्सला यंदा विजयाचा सूर सापडेना झाला आहे. पण असे असले तरी आता ते पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असतील. हंगामातील चौथ्या सामन्यासाठी रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईच्या संभावित ११ जणांच्या (CSK predicted XI) संघाबद्दल विचार करायचा झाल्यास मोठा बदल दिसण्याची शक्यता कमी आहे. चेन्नई ही नेहमी आपल्या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे या सामन्यासाठीही संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे.
चेन्नईकडून रॉबिन उथप्पाबरोबर ऋतुराज गायकवाड सलामीला फलंदाजी करताना दिसेल. तसेत मधली फळी अष्टपैलू मोईन अलीसह अंबाती रायडू, एमएस धोनी सांभाळताना दिसू शकतात. त्याचबरोबर अष्टपैलू जडेजासह शिवम दुबे, ड्वेन ब्रावो यांनाही संघात स्थान दिले जाईल. गोलंदाजी फळीत ड्वेन प्रिटोरियस, ख्रिस जॉर्डन आणि मुकेश चौधरी यांना संधी मिळू शकते.
केन विलियम्सनच्या (Kane Williamson) नेतृत्वाखाली खेळणारा सनरायझर्स हैदराबाद संघ देखील आयपीएल २०२२मध्ये पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. हैदराबादच्या संभावित ११ जणांच्या (SRH Predicted XI) संघातही फारसा बदल दिसेल असे वाटत नाही. पण, त्यांच्या सलामी जोडीमध्ये बदल होऊ शकतो. या सामन्यासाठी अभिषेक शर्मासह राहुल त्रिपाठी सलामीला येऊ शकतो.
तसेच कर्णधार केन विलियम्सन मधल्या फळीत दिसू शकतो. त्याला ऐडेन मार्करम, निकोलस पूरन यांची साथ मिळू शकते. त्याचबरोबर अष्टपैलू म्हणून वॉशिंग्टन सुंदर, अब्दुल सामद आणि रोमारियो शेफर्ड यांना संधी मिळू शकते, तर गोलंदाजी फळीत भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक आणि टी नटराजन यांच्यावर विश्वास दाखवला जाऊ शकतो.
आमने-सामने
चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद (Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad) संघ आत्तापर्यंत १६ वेळा आयपीएलमध्ये आमने-सामने आले आहेत. यात चेन्नईने १२ वेळा आणि हैदराबादने ४ वेळा विजय मिळवला आहे.
हवामान आणि खेळपट्टी
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघातील सामना डॉ. डी वाय पाटील स्पोर्ट्स ऍकेडमी (DY Patil Sports Academy, Mumbai) येथे होणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांना मदतशीर आहे. तसेच हा सामना दुपारी होणार असल्याने दवाचा प्रभाव फारसा जाणवणार नाही. या सामन्यामुळे मुंबईतील वातावरण उष्ण राहणार आहे. यावेळी तापमान साधारण ३३ चे ३० डिग्री सेल्सियसच्या आसपास राहिल.
आयपीएल २०२२ हंगामातील (IPL 2022) चेन्नई विरुद्ध हैदराबाद (CSK vs SRH) सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामना केव्हा होणार?
– आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामना ९ एप्रिल २०२२ रोजी खेळला जाणार आहे.
२. आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामना कुठे खेळवला जाणार?
– आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामना डॉ. डी वाय पाटील स्पोर्ट्स ऍकेडमी येथे खेळवला जाईल.
३. आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामना किती वाजता सुरु होणार?
– आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरु होईल. त्याआधी दुपारी ३.०० वाजता नाणेफेक होईल.
४. आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
चेन्नई सुपर किंग्स: ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, डेवॉन कॉनवे, मोईन अली, ड्वेन प्रीटोरियस, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा (कर्णधार), शिवम दुबे, एमएस धोनी (यष्टीरक्षक), ड्वेन ब्रावो, ख्रिस जॉर्डन, राजवर्धन हंगरगेकर, महेश तिक्षणा, ऍडम मिल्ने, मिशेल सँटनर, तुषार देशपांडे, हरी निशांत , एन जगदीसन, सुभ्रांशु सेनापती, प्रशांत सोलंकी, मुकेश चौधरी, केएम आसिफ, सिमरजीत सिंग, भगत वर्मा.
सनरायझर्स हैदराबाद संघ: केन विलियम्सन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), एडेन मार्करम, अब्दुल सामद, रोमारियो शेफर्ड, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक, श्रेयस गोपाल, जगदीशा सुचित, ग्लेन फिलिप्स, शशांक सिंग, रविकुमार समर्थ, विष्णू विनोद, प्रियम गर्ग, कार्तिक त्यागी, फजलहक फारुकी, मार्को जेन्सेन, सौरभ दुबे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘त्याने हलवाईच्या दुकानात बसले पाहिजे, आता त्याला बॅटिंग…’, बाद होताच मयंक चाहत्यांच्या निशाण्यावर
अफलातून! हार्दिक पंड्याने घेतला सुपर कॅच; पण ‘त्या’ एका चुकीमुळे लिविंगस्टोनला मिळाले जीवदान