---Advertisement---

पंजाब किंग्जला मिळाला नवा कर्णधार! धवन नाही, तर ‘या’ खेळाडूला मिळाली नेतृत्त्वाची जबाबदारी

On: सोमवार, फेब्रुवारी 28, 2022 1:35 PM
---Advertisement---

केएल राहुलने (KL Rahul) फ्रँचायझीची साथ सोडल्यानंतर पंजाब किंग्जला आगामी आयपीएल (IPL 2022) हंगामात एका नवीन कर्णधाराची आवश्यकता होती. त्यामुळे सोमवारी (२८ फेब्रुवारी) मयंक अगरवाल (Mayank Agarwal) पंजाब किंग्जचा नवीन कर्णधार असेल, अशी घोषणा फ्रँचायझीकडून केली गेली. पंजाब किंग्जने अगरवाल आणि अर्शदीप सिंह या दोन खेळाडूंना आयपीएल २०२२ साठी मेगा लिलावापूर्वी रिटेन केले होते आणि तेव्हापासूनच मयंक कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर होता.

पंजाब किंग्जने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून संघाच्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. पंजाब संघाच्या कर्णधारपदी नियुक्त झाल्यानंतर मयंक अगरवाल म्हणाला की, तो आयपीएल २०२२ मध्ये पंजाब किंग्जचे कर्णधारपद मिळाल्यामुळे खूप आनंदी आहे. यावेळी त्यांचा संघ आयपीएलचे विजेतेपद जिंकण्याचा प्रयत्नात असेल. यापूर्वी पंजाबने एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही.  दरम्यान, ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा मयंकला आयपीएल संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.

https://twitter.com/PunjabKingsIPL/status/1498168752134930432

मयंकच्या आधी केएल राहुल पंजाब किंग्जचा कर्णधार होता आणि तो स्वतः चांगले प्रदर्शनही करत होता. परंतु मेगा लिलावापूर्वी राहुलने पंजाब संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि लखनऊ सुपरजायंट्समध्ये सहभागी झाला. आयपीएलमध्ये नव्याने सहभागी होणाऱ्या लखनऊ संघाने राहुलला तब्बल १७ कोटी रुपयांमध्ये संघात सामील केले. अशात पंजाब किंग्जने केवळ दोन खेळाडूंना मेगा लिलावापूर्वी कायम केले होते.

त्यानंतर भारतीय दिग्गज शिखर धवनला पंजाब किंग्जने मेगा लिलावात विकत घेतले आणि त्यानंतर त्याचे नावही कर्णधारपदाच्या शर्यतीत होते. परंतु शेवटी मयंक अगरवालने बाजी मारल्याचे दिसले. मेगा लिलावात इतरही दिग्गज खेळाडूंना पंजाबने संघासोबत जोडले आणि आगामी हंगामात एका भक्कम संघासह फ्रँचायझी खेळताना दिसणार आहे. यामध्ये कगिसो रबाडा, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेयरस्टो अशा मोठ्या नावांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या –

रणजी ट्रॉफी: ‘या’ सामन्यात झाल्या तब्बल १३६७ धावा, पण निकाल अनिर्णितच

विराटचा १०० वा कसोटी प्रेक्षकांविना, मात्र दिवस-रात्र कसोटीसाठी ‘इतक्या’ चाहत्यांना स्टेडियममध्ये एंट्री

अन् १० वर्षांपुर्वी केलेल्या ‘त्या’ खेळीमुळे कोहलीला क्रिकेटमधील ‘विराट’ फलंदाज म्हणून मिळवून दिली ओळख

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---