---Advertisement---

लिलावात पहिल्याच दिवशी अनसोल्ड राहिलेला मिलर राजस्थानला भारी पडत ‘असा’ झालेला गुजरातमध्ये सामील

On: बुधवार, मे 25, 2022 4:00 PM
David-Miller-And-Hardik-Pandya
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२चा पहिला क्वालिफायर सामना मंगळवारी (२४ मे) गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगला. कोलकाताच्या इडन गार्डनवर झालेल्या या सामन्यात गुजरातने सात विकेट्सने विजय मिळवत अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला आहे. या सामन्यात शेवटच्या षटकात डेविड मिलर याने लागोपाठ तीन षटकार मारत संघाच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात संघाला शेवटच्या निर्णायक षटकात १६ धावांची गरज होती. यावेळी मिलर स्ट्राईकवर असता त्याने प्रसिद्ध कृष्णाला तीन षटकार फटकावत संघाला विजय मिळवून दिला.

तडाखेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या आणि ‘किलर मिलर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिलरमध्ये या आयपीएल लिलावाच्या पहिल्या दिवशी कोणत्याच संघाने रूची दाखवली नव्हती. त्याचा मागील संघ राजस्थाननेही त्याला संघात विकत घेण्याचे टाळले होते. पहिल्या दिवशी अनसोल्ड राहिलेल्या मिलरला संघात घेण्यासाठी दुसऱ्या फेरीत मात्र राजस्थान आणि गुजरात यांच्यात चढाओढ सुरू झाली होती.

एक कोटी मूळ किंमत असलेल्या मिलरवर गुजरातने ३ कोटींची बोली लावली होती. या लिलावत राजस्थानने मिलरवर पुढे बोली लावण्याचे टाळल्याने गुजरातने त्याला ३ कोटी रूपयांमध्येे संघात घेतले. गुजरातच्या संघ व्यवस्थापकांनीही त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला प्रत्येक सामन्यात खेळवले. नुकत्याच झालेल्या सामन्यात त्याने खेळलेली खेळी ही संघासाठी आणि त्याच्यासाठीही अविस्मरणीय ठरली आहे.

राजस्थान विरुद्धच्या या क्वालिफायर सामन्यात मिलरने ३८ चेंंडूत नाबाद ६८ धावा केल्या. त्याचबरोबर त्याने चौथ्या विकेटसाठी पंड्यासोबत नाबाद १०६ धावांची भागीदारी केली. यावेळी त्याने पाच षटकार आणि तीन चौकार मारले.

सामना फिरवण्याची किंवा एकहाती सामना जिंकून देण्याची कौशल्य असलेल्या मिलरला मागील हंगामात राजस्थानकडून अधिक संधी मिळाल्या नव्हत्या. या आयपीएल हंगामात त्याने संधींचा पुरेपूर फायदा घेत उत्तम फलंदाजी केली. त्याने गुजरातकडून खेळताना १५ सामन्यांमध्ये ६४.१४च्या सरासरीने ४४९ धावा केल्या आहेत.

महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

असं काय घडलं? पंड्या, बटलर आणि मिलर पेक्षा जास्त गाजला युवा यशस्वी जयस्वाल; पहा व्हिडिओ…

असं काय घडलं? पंड्या, बटलर आणि मिलर पेक्षा जास्त गाजला युवा यशस्वी जयस्वाल; पहा व्हिडिओ…

‘भारताचे गॅरी सोबर्स’ अशी ओळख मिळवणारे दिग्गज, २६ सामन्यांच्या कारकिर्दीत रचला होता विक्रमांचा ढीग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---