आयपीएल २०२२ (IPL 2022) पूर्वी बेंगलोरमध्ये मेगा लिलाव (mega auction) पार पडला. १२ आणि १३ फेब्रुवारीला घेतल्या गेलेल्या लिलावात अनेक मोठे खेळाडू सहभागी झाले होते. काही खेळाडूंनी खुप पैसे कामावले, तर काहींना खरेदीदार सुद्धा मिळाले नाहीत. इंग्लंड क्रिकेट संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) यानेही लिलावात सहभाग घेतला होता. मुंबई इंडियन्सने त्याला मोठी रक्कम खर्च करून संघात सामील केले आहे, पण तो पुढच्या हंगामात खेळताना दिसणार नाहीय. त्याला ट्रेंट बोल्टचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे.
इंग्लंड संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर मागच्या मोठ्या काळापासून दुखापतीशी झगडत आहे. याच कारणास्तव तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही विश्रांतीवर आहे. दुखापतीमुळे आर्चरने आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता, पण नंतर बीसीसीआयने जाहीर केलेल्या ५९० खेळाडूंच्या यादीत त्याचा सहभाग होता. हे ५९० खेळाडू मेगा लिलावात प्रत्यक्ष सहभागी होणार होते.
मेगा लिलावात आर्चरचे नाव येताच सर्व संघ त्याला विकत घेण्यासाठी इच्छुक दिसले. मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात अर्चरला खरेदी करण्यासाठी चढाओढ पाहायला मिळाली. परंतु यामध्ये मुंबई इंडियन्सने अखेर बाजी मारली. मुंबईने त्याला खरेदी करण्यासाठी तब्बल आठ कोटी रुपयांची बोली लावली, जी सर्वाधिक होती. मेगा लिलावासाठी आर्चरने त्याची बेस प्राइस २ कोटी ठेवली होती.
यात विशेष गोष्ट ही आहे की, आयपीएलच्या पुढच्या हंगामात आर्चर खेळताना दिसणार नाहीय, तरीही मुंबई इंडियन्सने त्याला ही मोठी रक्कम खर्च करून संघात सामील केले आहे. दुखापतीमुळे मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात आर्चरची शस्त्रक्रिया केली गेली होती. सध्या तो दुखापतीवर काम करत आहे. आयपीएल २०२३ पर्यंत तो खेळण्यासाठी तयार असेल, अशी शक्यता आहे.
आर्चरचे आयपीएलमधील प्रदर्शन आतापर्यंत अप्रतिम राहिले आहे. याच कारणास्तव मुंबई इंडियन्सने त्याला खरेदी करण्याचा निर्णय घेतला असू शकतो. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ३५ आयपीएल सामन्यांमध्ये ४६ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याची इकोनॉमी फक्त ७.१३ होती, तर सरासरी २१.३२ होती. आर्चर यापूर्वी राजस्थान रॉयल्ससाठी खेळला आहे.
महत्वाच्या बातम्या –
सीएसकेमध्ये महाराष्ट्रीयन खेळाडूंची एकहाती सत्ता! ऋतुराजसह गायकवाडसह ‘हे’ ५ शिलेदार सामील
डेवन कॉन्वेचा चेन्नईमध्ये प्रवेश !! तब्बल इतक्या कोटींची लागली बोली
पंजाबचे धन्यवाद, पण मला चेन्नईकडून अपेक्षा होत्या; शाहरुख खानने केल्या भावना व्यक्त