आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने शनिवार आणि रविवार (१२ आणि १३ फेब्रुवारी) या दोन दिवशी मेगा लिलाव (mega auction) आयोजित केला आहे. लिलावाच्या पहिल्या दिवशी भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला (ravichandra ashwin) राजस्थान रॉयल्सने विकत घेतले आहे. अश्विनला संघात सामील करण्यासाठी राजस्थान रॉयल्सने ५ करोड रुपये मोजले. राजस्थान रॉयल्सने अश्विनला खरेदी करताच भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग (virendra sehwag) याने खास ट्वीट करून त्याची फिरकी घेतली.
Haha Ashwin to Rajasthan. Will love him plotting a Mankad with Buttler.
— Virender Sehwag (@virendersehwag) February 12, 2022
रविचंद्रन अश्विन आतापर्यंत तीन आयपीएल फ्रेंचायझींमधून खेळला आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांचा समावेश आहे. राजस्थान रॉयल्स त्याच्यासाठी चौथी आयपीएल फ्रेंचायझी आहे. राजस्थान रॉयल्समध्ये सामील झाल्यानंतर आता अश्विन आणि इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) यांना एक ड्रेसिंग रूम शेअर करावी लागणार आहे.
विरेंद्र सेहवागने यापूर्वी झालेल्या मंकडींग प्रकरणाची आठवण काढत ट्वीट केले की, “हा हा ! अश्विनला राजस्थान संघात गेला. आता त्याला बटलरसोबत मंकड विकेट प्लान करतान पाहून मला चांगले वाटेल.” दरम्यान, अश्विन आणि बटलर यांच्यात २०१९ आयपीएमध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यावेळी अश्विन पंजाब किंग्जसाठी खेळत होता आणि राजस्थानसाठी बटलर चांगल्या फॉर्ममध्ये फलंदाजी करत होता. पण अशातच अश्विनने बटलरला मंकडींग बाद केले आणि सामन्यांचे चित्र पूर्णपणे पालटले. अश्विनच्या या रणनीतीमुळे त्याच्यावर अनेकांनी टीका केली होती. सेहवाने ट्वीट करून या संपूर्ण प्रकरणाला पुन्हा एकदा उजाळा दिला आहे.
दरम्यान, अश्विनला २०२२ मेगा लिलावात नुकसान झाले आहे. मागच्या हंगामासाठी दिल्ली त्याला ७.६० करोड रुपये मिळाले होते. परंतु या हंगामासाठी त्याला ५ करोड रुपयांवर समाधान मानावे लागले आहे. मेगा लिलावात त्याला ३४ टक्के नुकसान सोसावे लागले आहे आणि उघडपणे २.६० करोड रुपये कमी मिळाले आहेत.
राजस्थान रॉयल्सने लिलावाच्या पहिल्या दिवशी अश्विनसह न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यालाही खरेदी केले. बोल्ट १५० टक्क्यांच्या फायद्यासह ८ करोड रुपयांमध्ये विकला गेला. राजस्थानेने मेगा लिलिवापूर्वी कर्णधाराच्या रूपात संजू सॅमसन (१४ करोड) संघात रिटेन केले होते. तसेच जोस बटलर (१० करोड) आणि यशस्वी जयस्वाल (४ करोड) यांनाही संघात रिटेन केले गेले होते.
महत्वाच्या बातम्या –
वेलकम होम!! तब्बल ‘इतक्या’ कोटींची बोली लावत केकेआरने नितीश राणाला आपल्या ताफ्यात दिले स्थान
शिमरॉन हेटमायर झाला कोट्यधीश!! आगामी हंगामात ‘या’ संघाचे करणार प्रतिनिधित्व