आयपीएल २०२२ (IPL 2022) पूर्वी बीसीसीआयने बेंगलरमध्ये १२ आणि १३ फेब्रुवारीला मेगा लिलाव (IPL mega auction) आयोजित केला. आयपीएलच्या पुढच्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नवीन फ्रेंचायझी सहभागी होणार आहेत. त्यामुळे मेगा लिलावात आठ ऐवजी दहा संघांनी खेळाडूंवर बोली लावल्या. लिलावाच्या दुसऱ्या दिवशी चेन्नईने एका युवा अनकॅप्ड खेळाडूला खरेदी केले, ज्याच्या गुणवत्तेची संघाला पूर्ण कल्पना आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये ओडिसा संघासाठी खेळणाऱ्या शुभ्रांशू सेनापती (shubhranshu senapati) याला चेन्नई सुपर किंग्जने संघात सामील केले. पुढच्या हंगामात सेनापतीला संघात खेळवण्यासाठी चेन्नईने त्याला बेस प्राइस २० लाख रुपयांमध्ये खरेदी केले आहे. दरम्यान मेगा लिलावापूर्वी मागच्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात चेन्नई संघाकडून निवड चाचणीसाठी बोलावले गेले होते. विजय हजारे ट्रॉफीच्या मागच्या हंगामात त्याने ओडिसा संघासाठी उत्कृष्ट प्रदर्शन केले होते आणि त्याच्याच जोरावर त्याने चेन्नई संघात जागा मिळवली आहे.
उजव्या हाताचा फलंदाज शुभ्रांशू सेनापती विजय हजारे ट्रॉफीच्या मागच्या हंगामात सर्वाधिक धावा करणार फलंदाज ठरला होता. त्याने सर्वप्रथम २०१६ साली ओडिसा संघाकडून खेळताना त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पदार्पण केले होते. तसेच देशांतर्गत टी-२० क्रिकेटमध्ये त्याने ओडिसा संघाकडून २०१७ मध्ये पदार्पण केले.
दरम्यान, मेगा लिलावात चेन्नई सुपर किंग्जने सेनापतीव्यतिरिक्त घेतलेल्या खेळाडूंचा विचार केला, तर त्यामध्ये दीपक चाहर, अंबाती रायडू, ड्वेन ब्रावो, शिवम दुबे ही महत्वाची नावे येतात. दीपक चाहरला मेगा लिलावात खरेदी करण्यासाठी चेन्नईने तब्बल १४ कोटी रुपये खर्च केले. अंबाती रायडूसाठी संघाला ६ कोटी ७५ लाख मोजावे लागले. तसेच ड्वेन ब्रावो ४.४० कोटी, तर शिवम दुबे ४ कोटी रुपयांमध्ये सीएसकेला मिळाले.
मेगा लिलावापूर्वी सीएसकेने कर्णधार एमएस धोनी (१२ कोटी), रवींद्र जडेजा (१६ कोटी), युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड (६ कोटी) आणि अष्टपैलू मोईन अली (८ कोटी) यांना रिटेन केले होते.
महत्वाच्या बातम्या –
IPL Auction: इंग्लडचा ‘हा’ गोलंदाज मुंबईच्या ताफ्यात दाखल; १.५० कोटींची लागली बोली
विंडीजच्या ‘या’ गोलंदाजासाठी चेन्नई- मुंबईही भिडले, पण हैदराबादने ७.७५ कोटी मोजत मारली बाजी
यूपीच्या अष्टपैलूवर गुजरात टायटन्सने लावला डाव, तब्बल ३.२० कोटींची किंमत केली खर्च