बुधवारी (०६ एप्रिल) आयपीएल २०२२चा १४वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला गेला. हा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. मुंबई इंडियन्ससाठी त्यांचा अष्टपैलू कायरन पोलार्डने धमाकेदार खेळी केली, पण श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील केकेआरने या सामन्यात मुंबईला ५ विकेट्सने सहज मात दिली. मुंबईसाठी चालू आयपीएल हंगामातील हा सलग तिसरा पराभव ठरला आहे. पोलार्डच्या या ५ चेंडूंच्या तुफानी खेळीनंतर त्याच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद झाली आहे.
मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) या सामन्यात प्रथम फलंदाजी केली आणि ४ विकेट्सच्या १६१ धावा केल्या. वेस्ट इंडिजचा दिग्गज अष्टपैलू कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याने मुंबईसाठी डावाच्या शेवटी धमाका केला. पोलार्डने या सामन्यात अवघ्या ५ चेंडूंचा सामना केला आणि यामध्ये नाबाद २२ धावा केल्या. या धावा त्याने ४४०च्या स्ट्राईक रेटने केल्या. आयपीएलच्या इतिहासातील ही एक तुफानी खेळी ठरली. आयपीएलमध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेटसह खेळल्या गेलेल्या डावांमध्ये ही दुसऱ्या क्रमांकाची खेळी ठरली.
आयपीएलमध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेट राखून खेळल्या गेलेल्या डावांचा विचार केला, तर पहिल्या क्रमांकावर कृणाल पांड्याचे नाव येते, ज्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात ५००च्या स्ट्राईक रेटसह ४ चेंडूत नाबाद २० धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कायरन पोलार्डचे नाव येते. तिसऱ्या क्रमांकावर ख्रिस मॉरिस आहे, ज्याने रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाविरुद्ध ४२२च्या स्ट्राईक रेटने ९ चेंडूत नाबाद ३८ धावा केल्या होत्या. त्यानंतर यादीच चौथ्या क्रमांकावर अक्षर पटेलचे नाव येते, ज्याने सीएकेविरुद्धच्या एका सामन्यात ५ चेंडूत नाबाद २१ धावा केल्या होत्या.
मुंबई आणि केकेआरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्याचा विचार केला, तर केकेआरच्या विजयात ऑस्ट्रेलियन दिग्गज पॅट कमिन्सने जबरदस्त प्रदर्शन केले. गोलंदाज कमिन्सने प्रथम गोलंदाजीत ४९ धावा खर्च करून २ विकेट्स घेतल्या. त्यानंतर फलंदाजी करताना तर त्याने कमाल केली. अवघ्या १४ चेंडूत अर्धशतक आणि १५ चेंडूत ५६ धावांची महत्वाची खेळी त्याच्या बॅटमधून निघाली. मुंबई इंडियन्सने दिलेले १६२ धाावांचे लक्ष्य केकेआरने ५ विकेट्सच्या नुकसानावर आणि १६ षटकांमध्ये गाठले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सच्या ‘बेबी एबी’ची आयपीएल पदार्पणातच कमाल, मैदानात पाय टाकताच केला खास विक्रम
पॅट कमिन्सकडून मुंबईच्या गोलंदाजांनी मनसोक्त धुलाई! अवघ्या १४ चेंडूत झळकावले विक्रमी अर्धशतक
MI vs KKR | मुंबईची पराभवाची हॅट्रिक, कमिन्सच्या विक्रमी अर्धशतकाच्या जोरावर कोलकाताचा शानदार विजय