आयपीएल २०२२च्या ५६व्या सामन्यात मुंबई इंंडियन्सचा डाव एखाद्या पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला आणि केकेआरने ५२ धावांनी विजय मिळवला. चालू हंगामातील मुंबई इंडियन्सचा हा ९वा पराभव होता, तर केकेआरचा ५वा विजय आहे. या सामन्यात मुंबईने केकेआरला प्रथम फलंदाजी करताना १६५ धावसंख्येवर रोखले होते, पण फलंदाजी करताना स्वतः देखील झटपट विकेट्स गमावून बसले. या सामन्यात अनेक विक्रम घडले. आपण या लेखात सामन्यात घडलेल्या ११ प्रमुख विक्रमांविषयी माहिती घेणार आहोत.
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर मुंबईने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मागच्या काही दिवसांपासून फॉर्ममध्ये नसलेल्या जसप्रीत बुमराहने या सामन्यात मात्र ५ विकेट्स घेतल्या. केकेआरने प्रथम फलंदाजी करताना ९ विकेट्सच्या नुकसानावर १६५ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघ ११३ धावांवर सर्वबाद झाला. चला तर नजर टाकूया सामन्यात बनलेल्या विक्रमांवर.
१. आयपीएल २०२२ मध्ये प्रथम फलंदाजी करताना केकेआरने पहिल्यांदाच मिळवला विजय विरुद्ध आरसीबी, डी वाय पाटील स्टेडियम – ३ विकेट्सने पराभूत
विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, ब्रेबोर्न स्टेडियम – ७ विकेट्सने पराभूत
विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, वानखडे स्टेडियम – ४ विकेट्सने पराभूत विरुद्ध मुंबई इंडियन्स, डी पाय पाटील स्टेडिय – ५२ धावांनी विजयी*
२. केकेआरसाठी हंगामातील सर्वात मोठी सलामीवीरांची भागीदारी अजिंक्य रहाणे आणि वेंकटेश अय्यर – ६० धावांची भागीदारी
३. आयपीएल २०२२ मध्ये वेंकटेश अय्यरचे प्रदर्शन विरुद्ध मुंबई इंडियन्स – ५०* (४१) आणि ४३ (२४)
विरुद्ध इतर संघ – ८ डावांमध्ये ८२ धावा
४. आयपीएल २०२२मध्ये फिरकी गोलंदाजांविरुद्ध श्रेयस अय्यरचे प्रदर्शन डाव – ७
धावा – ३६
स्ट्राईक रेट – १००.००
विकेट – ६ वेळा
५. आयपीएलमध्ये आंद्रे रसेल विरुद्ध जसप्रीत बुमराह डाव – ९
धावा – ५६
स्ट्राईक रेट- १२७.२७
विकेट – ४ वेळा
६. आयपीएलमध्ये पॅट कमिन्सचे मुंबई इंडियन्सविरुद्धचे प्रदर्शन डाव – ६
धावा – १५६
सरासरी – ५२
स्ट्राईक रेट – १९७.४७
सर्वोत्कृष्ट फलंदाजी प्रदर्शन – ५६*
७. बुमराहचे टी-२० मधील सर्वोत्तम प्रदर्शन ५/१० – (आयपीएल २०२२)
४/१४ – (आयपीएल २०२०)
४/२० – (आयपीएल २०२०)
८. आयपीएल इतिहासात गोलंदाजांचे सर्वोत्तम प्रदर्शन ६/१२ अल्झारी जोसेफ, मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, २०१९
६/१४ सोहेल तनवीर, राजस्थान रॉयल्स विरुद्ध सीएसके, २००८
६/१९ ऍडम झम्पा, पुणे सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, २०१६
५/५ अनिल कुंबले, आरसीबी विरुद्ध राजस्थान रॉयल्स, २००९ ५/१० जसप्रीत बुमराह, मुंबई इंडियन्स विरुद्ध केकेआर, २०२२*
९. मागच्या चारही सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने मोठ्या अंतराने जिंकला सामना ७५ धावा, लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध केकेआर
६७ धावा, आरसीबी विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
९१ धावा, सीएसके विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ५२ धावा, केकेआर विरुद्ध मुंबई इंडियन्स*
१०. चालू हंगामात मुंबई इंडिसन्सने गमावले सर्वाधिक सामने
९ पराभव – आयपीएल २०२२
८ पराभव- आयपीएल २००९, २०१४ आणि २०१८
११. पाच डावांमध्ये चौथ्यांदा पॅट कमिन्सने इशान किशनची घेतली विकेट