रविवारी (२४ एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने मुंबई इंडियन्सविरुद्ध हंगामातील दुसरे शतक ठोकले. मुंबईविरुद्धच १५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात राहुलने हंगामातील पहिले, तर आता दुसरे शतक ठोकले. केएल राहुलचे आयपीएलच्या संपूर्ण कारकिर्दीतील हे चौथे शतक ठरले. राहुलने आता आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत संजू सॅमसन आणि एबी डिविलियर्सला मगे टाकले आहे.
वानखडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स (MI vs LSG) यांच्यात आयपीएलचा ३७वा सामना खेळला गेला. हा सामना लखनऊने ३६ धावांनी जिंकला. लखनऊचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याने ६२ चेंडूंचा सामना केला आणि नाबाद १०३ धावा ठोकल्या. सलामीसाठी आलेला राहुल १२ चौकार आणि ४ षटकार ठोकून शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिला. या शतकासह राहुल आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
CENTURY for @klrahul11 👏👏
His second in #TATAIPL 2022 pic.twitter.com/GPTGfKHKYl
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2022
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
आयपीएच्या इतिहासात वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेलच्या नावावार सर्वाधिक ६ शतके आहेत. यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आहे, ज्याने आयपीएलमध्ये ५ शतके केली आहेत. त्यानंतर डेविड वॉर्नर, शेन वॉटसन, जोस बटलर आणि आता त्यांच्या जोडीला राहुल नव्याने सहभागी झाला आहे. या चौघांच्या नावावर प्रत्येक ४ आयपीएल शतकांची नोंद आहे. त्यानंतर नाव येते संजू सॅमसन आणि एबी डिविलियर्सचे, ज्यांच्या नावावर प्रत्येक तीन आयपीएल शतकांची नोंद आहे. यापूर्वी राहुल सॅमसन आणि डिविलियर्सच्या बरोबरीला होता, पण आता राहुल या दोघांच्या पुढे गेला आहे.
दरम्यान, मुंबई आणि लखनऊ यांत्यात रविवारी खेळलेल्या सामन्याचा विचार केला, तर लखनऊने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्सच्या नुकसानावर १६८ धावा केल्या. कर्णधार राहुल व्यकितिरिक्त एकही खेळाडू लखनऊ साठी २५ धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही. तर दुसरीकडे मुंबईसाठी कर्णधार रोहित शर्माने ३९, तर मध्यक्रमात तिलक वर्माने ३८ धावाचे योगदान दिले. या दोघाव्यतिरिक्त मुंबईचा संपूर्ण संघ अपयशी ठरला. परिणामी मुंबईने हंगामातील सलग आठवा सामना ३६ धावांच्या अंतराने गमावला. हा मुंबईचा आयपीएल हंगामातील सलग आठवा पराभव होता.
सर्वाधिक आयपीएल शतके करणारे फलंदाज
६ – ख्रिस गेल
५ – विराट कोहली
४ – केएल राहुल*
४ – जोस बटलर
४ – डेविड वॉर्नर
४ – शेन वॉटसन
३ – संजू सॅमसन
३ – एबी डिविलियर्स
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईविरुद्धच्या ‘त्या’ पराभवानंतर तुटला होता ‘कॅप्टन कूल’ धोनीच्या संयमाचा बांध; शेन वॉटसनचा खुलासा
कडकच ना! इकडं गुजरातला मिळाली विकेट अन् तिकडं हार्दिक पंड्याच्या पत्नीनं लावला ठुमका