आयपीएल २०२२ च्या ९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ आमने सामने होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात खेळताना मुंबईचा सलामीवीर ईशान किशन चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. परंतु राजस्थनच्या नवदीप सैनीने एक अप्रतिम झेल घेत त्याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना त्यांचा सलामीवीर जोस बटलरने जबरदस्त फलंदाजी करत शतक पूर्ण केले. मुंबई इंडियन्सचा सलामीवीर ईशान किशन (Ishan Kishan) देखील बटरलप्रमाणे शतकी खेळी करण्याच्या विचाराने खेळत होता, पण नवदीप सैनीमुळे त्याला लवकर तंबूत परतावे लागले. ईशान किशनने त्याची विकेट डावाच्या १३ व्या षटकात गमावली. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ड (Trent Boult) या षटकात गोलंदाजी करत होता. षटकातील शेवटच्या चेंडूवर ईशानने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू सीमारेषेपार जाऊ शकला नाही.
ईशानने हा शॉट डीप बॅकवर्ड स्क्वेयर लेगला खेळला होता आणि या ठिकाणी वेगवान गोलंदाज नवदीप सैनी (Navdeep Saini) क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. सीमारेषेजवळ उभा असलेल्या सैनीने एक अप्रतिम झेल पकडला आणि ईशान किशनला तंबूचा रस्ता दाखवला. झेल घेताना सैनीला दुखापत झाल्याचे दिसले, परंतु ती दुखापत गंभीर नसल्यामुळे चिंतेची बाब नव्हती. सैनीने घेतलेला हा झेल चर्चेचा विषय ठरत आहे.
Boult to Ishan, OUT 🎳 🎯
What's happened there? Saini takes a catch, but he has taken a blow to his head/back of the neck while completing the catch.Ishan Kishan c Saini b Boult 54 (43b 5×4 1×6) SR: 125.58. 🔰 pic.twitter.com/XsdW58681f
— Live Cricket Master Updater (@MohsinM55415496) April 2, 2022
ईशान बाद झाला तेंव्हा मुबईची धावसंख्या १२१ होती आणि संघाने तीन विकेट्स गमावल्या होत्या. ईशानच्या रूपाने राजस्थानला त्यांची चौथी आणि महत्वाची विकेट मिळाली. ईशानने या सामन्यात एकूण ४३ चेंडू खेळले आणि यामध्ये ५४ धावा केल्या. यामध्ये त्याने त्याने ४ चौकार आणि १ षटकारही मारला.
ईशानच्या मागच्या चार आयपीएल सामन्यांचा विचार केला, तर त्याने या चारही सामन्यांमध्ये त्याने अर्धशतकी खेळी केली. ईशान आणि युवा तिलक वर्मा (६१) या दोघांनी या सामन्यात मुंबईसाठी आर्धशतक ठोकले, पण संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही.
सामन्याचा विचार केला, तर राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट्सच्या नुकसानावर १९३ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सला मात्र हे लक्ष्य गाठता आले नाही. राजस्थानने २३ धावा शिल्लक ठेऊन विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या –
DC vs GT | नाणेफेकीचा कौल रिषभच्या खात्यात, एका बदलासह असे आहेत दिल्ली आणि गुजरातचे संघ
काटा किर्रर्र..! बटलरचे मुंबईविरुद्ध अविस्मरणीय शतक, पण बुमराहने दिली तितकीच वेदनादायी जखम
अखिल भारतीय टॅलेंट सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात काव्या पांडे हिला दुहेरी मुकुट