---Advertisement---

Video: नुसती निराशा… राजस्थानविरुद्ध रोहित फक्त १० धावा करून बाद, पत्नी रितिकाने मुरडले नाक

On: रविवार, एप्रिल 3, 2022 12:03 AM
---Advertisement---

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा विजेतेपद पटकावेला संघ मुंबई इंडियन्सचे चालू हंगामातील प्रदर्शन अद्याप निराशाजनक राहिले आहे. शनिवारी (०२ एप्रिल) मुंबईने हंगामतील दुसरा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळला आणि यामध्ये २३ धावांनी पराभव पत्करला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. रोहित स्वस्तात बाद झाल्यामुळे रोहितची पत्नी रितिका सजदेहच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसली.

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाकडून मिळालेल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जेव्हा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ मैदानात आला, तेव्हा त्यांची सुरुवात निराशाजनक राहिली. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अवघ्या १० धावा करून बाद झाला. रोहितने ५ चेंडूचा सामना केला आणि यादरम्यान एक षटकार देखील मारला. यानंतर प्रसिद्ध कृष्णाने टाकलेल्या चेंडूवर रियान परागच्या हातून रोहित झेलबाद झाला.

रोहितची पत्नी सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित होती. व्हिआयपी बॉक्समध्ये बसलेली रितिका सजदेह (Ritika Sajdeh) रोहितने स्वस्तात विकेट गमावल्यानंतर मात्र निराश झाल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे रोहित मात्र खाली मान घालून मैदानातून बाहेर जाताना दिसला.

https://www.instagram.com/tv/Cb2kItIvza6/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/Cb2zl6-vzFO/?utm_source=ig_web_copy_link

सामन्याचा विचार केला, तर इंग्लंडचा सलामीवीर जोस बटलरने सामन्यात अप्रतिम प्रदर्शन करत वैयक्तिक शतक पूर्ण केले. जोस बटलरच्या तुफानी खेळीमुळे राजस्थानने मोठी धावसंख्या उभारली. मुंबईने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीची संधी दिली होती. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने ८ विकेट्सच्या नुकसानावर १९३ धावा केल्या.

प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स जेव्हा मैदानात उतरला, तेव्हा रोहितच्या रूपात त्यांना पहिला झटका मिळाला. डावाच्या दुसऱ्या षटकात रोहितने मैदान सोडले. सलामीवीर ईशान किशन आणि मध्यक्रमातील तिलक वर्मा यांनी सर्वाधिक धावा केल्या. ईशान आणि तिलकने अनुक्रमे ५४ आणि ६१ धावा केल्या. असे असले तरी, मुंबई विजयापासून २३ धावांच्या अंतरावर राहिले आणि परिणामी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. गोलंदाजांमध्ये मुंबईसाठी जसप्रीत बुमराह आणि टायमल मिल्स यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या.

महत्वाच्या बातम्या –

अनुष्काच्या सुंदर फोटोला पाहून विराट पुन्हा एकदा पडला प्रेमात! कमेंट करत म्हणाला, ‘उफ टू हाॅट’

Video | डोक्याला चेंडू लागला, तरीही कॅमेरामॅनने दिली केसाला धक्काही न लागल्यासारखी रिऍक्शन

राणाचा जबरदस्त झेल अन् शाहरुखचा ‘बदक’, पण ‘तिच्या’ रिऍक्शनने वेधले साऱ्यांचेच लक्ष; पाहा Video

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---