आयपीएल २०२२ चा ९ वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स (MI vs RR) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात विजय मिळवणे राजस्थान रॉयल्सपेक्षा मुंबई इंडियन्ससाठी अधिक महत्वाचे होते. कारण मुंबईने त्यांचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गमावला होता, पण राजस्थानने मात्र पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जला मात दिली होती. मुंबई आणि राजस्थानमधील या सामन्यात वेस्ट इंडीजच्या दोन दिग्गजांमध्ये घमासान झाल्याचे पाहायला मिळाले.
वेस्ट इंडीजचा वरच्या फळीतील फलंदाज शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) याने या सामन्यात त्याचा राष्ट्रीय संघातील सहकारी कायरन पोलार्डची चांगलीच धुलाई केली. वेस्ट इंडीजचा कर्णधार कायरन पोलार्ड (Kieron Pollard) अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करत आला आहे आणि या सामन्यात हेटमायरने त्याची कसलीही कदर न करता खूप धुलाई केली. कायरन पोलार्डने राजस्थानच्या फलंदाजीवेळी १७ व्या षटकात गोलंदाजी केली आणि मुंबई इंडियन्सला हे षटक खूपच महागात पडले.
पालार्डने टाकलेल्या १७ व्या षटकात हेटमायरच्या तुफानी फलंदाजीमुळे तब्बल २६ धावा खर्च केल्या. पोलार्डने त्याच्या पहिल्या तीन षटकात किफायतशीर गोलंदाजी केली होती, पण शेवटच्या षटकात तो संघासाठी महागात पडला. या एका षटकात हेटमारयरने सामन्याचे चित्र पालटून टाकले आणि राजस्थानची धावसंख्या झपाट्याने वाढली. पहिल्या दोन चेंडूवर हेटमायरने लागोपाठ दोन षटकार मारले. त्यानंतर पुढच्या दोन चेंडूवर त्याने लागोपाठ दोन चौकार मारले. पोलार्डने या षटकात एकूण २६ धावा खर्च केल्या.
या षटकात हेटमायरने भलतीच धुलाई केल्यामुळे पोलार्डच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसू लागली होती. तसेच मुंबईचा कर्णधार रोहित शर्माचेही तोंड पडले होते.
https://twitter.com/MohsinM55415496/status/1510217337013743619?s=20&t=JMeBLYH_mTI9YOAwkgfJ2w
https://twitter.com/manish_ydv_18/status/1510245129575370754?s=20&t=JMeBLYH_mTI9YOAwkgfJ2w
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर रोहित शर्माने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रतित केले. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने ८ विकेट्सच्या नुकसानावर १९३ धावा केल्या. यामध्ये सलामीवीर जोस बटलरने सर्वाधिक १०० धावांची खेळी केली. बटलरचे हे आयपीएल इतिहासातील दुसरे शतक होते. मुंबईसाठी जसप्रीत बुमराह आणि टायमन मिल्सने प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या.
महत्वाच्या बातम्या –
सेफ हँड्स! पडीक्कलचा झेल रोहितसाठी ठरला विक्रमी, पूर्ण केले ट्वेंटी ट्वेंटीमधील ‘दीडशतक’
IPL2022 | जोस बटलर ठरला आयपीएलच्या १५व्या हंगामात शतक झळकावणारा पहिला फलंदाज
अखिल भारतीय टॅलेंट सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात काव्या पांडे हिला दुहेरी मुकुट