आयपीएल २०२२ हंगामाच्या ९ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स आमने-सामने होते. या सामन्यात राजस्थानने २३ धावांनी विजय मिळवला. राजस्थानचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल त्याच्या टी-२० प्रदर्शनासाठी ओळखला जातो. या सामन्यातही त्याने अप्रतिम प्रदर्शन केले. चहलकडे मुंबईविरुद्धच्या या सामन्यात विकेट्सची हॅट्रिक करण्याची संधी होती, पण सुमार क्षेत्ररक्षणामुळे ही संधी त्याच्या हातातून निसटली.
युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या दोन खेळाडूंना तंबूत पाठवू शकला. त्याने टाकेलल्या चार षटकात २६ धावा खर्च केल्या आणि दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. मुंबईच्या डावाच्या १६ व्या षटकात चहलने अप्रतिम गोलंदाजी केली. षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने टिम डेविडला पायचीत पकडले. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर डॅनियल सॅम्स जोस बटलरच्या हातात झेलबाद झाला.
षटकातील तिसऱ्या चेंडूवर मुरुगन अश्विन बाद झाला असता, पण करुण नायरच्या चुकीमुळे चहलची हॅट्रिकची संधी हुकली. चेंडू मुरुगन अश्विनच्या बॅटला लागून स्लीपमध्ये थांबलेल्या करुण नायरच्या हाती गेला. करुणने झेल घेण्यासाठी डाइव्ह मारली, पण झेल घेऊ शकला नाही. करुण नायरने हा सोपा झेल सोडल्यामुळे चहलचे पहिल्या आयपीएल हॅट्रिकचे स्पप्नही भंगले.
https://twitter.com/Peep00470121/status/1510249574237360132
करुण नायरला या सामन्यात पर्यायी क्षेत्ररक्षकाच्या रूपात सहभागी केले गेले होते. झेल सुटल्यानंतर चहल खूप निराश दिसला. झेल सुटल्यानंतर चहलने मागे वळूनही पाहिले नाही आणि पुढचा चेंडू टाकण्यासाठी गेला. षटक पूर्ण झाल्यावर मात्र, चहल खिलाडूवृत्तीने करुणसोबत बोलताना दिसला आणि दोघे हसत देखील होते. चहलने चालू आयपीएल हंगामामध्ये आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने पहिल्या सामन्यात २२ धावा खर्च करून ३ विकेट्स घेतल्या होत्या.
जर चहलने या सामन्यात हॅट्रिक घेतली असती, तर ही आयपीएल २०२२ हंगामाची पहिली हॅट्रिक ठरली असती. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत २० हॅट्रिक घेतल्या गेल्या आहेत. यामध्ये भारतीय गोलंदाजांचा विचार केला, तर अमित मिश्राच्या नावावर तीन आणि युवराज सिंगच्या नावावर दोन हॅट्रिकची नोंद आहे. राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीकडून आतापर्यंत चार हॅट्रिक झाल्या आहेत. यामध्ये अजीत चंडीला, प्रवीण तांबे, शेन वॉटसन आणि श्रेयस गोपाल यांनी ही कामगिरी केली आहे.
महत्वाच्या बातम्या –
Video: नुसती निराशा… राजस्थानविरुद्ध रोहित फक्त १० धावा करून बाद, पत्नी रितिकाने मुरडले नाक
DC vs GT | शुबमनची शानदार खेळी अन् फर्ग्युसनचा भेदक मारा, गुजरातचा दिल्लीवर सोपा विजय
शास्त्रींना स्वत:वर आहे भरपूर विश्वास; म्हणे, आयपीएल खेळलो असतो, तर ‘इतक्या’ कोटींना गेलो असतो