---Advertisement---

ईशान-सूर्याच्या फिटनेसबाबत मुंबई इंडियन्सकडून आले अपडेट; राजस्थानविरुद्ध…

ISHAN, Suryakumar
---Advertisement---

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा विजेतेपद पटकावणारा संघ मुंबई इंडियन्ससाठी या हंगामाची अपेक्षित सुरुवात होऊ शकली नाही. पहिल्या सामन्यात मुंबईला दिल्ली कॅपिटल्सकडून पत्करावा लागला होता. आता शनिवारी (२ एप्रिल) मुंबईला त्यांचा दुसरा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळायचा आहे. दुसऱ्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा डायरेक्टर जहीर खानने चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली.

भारताचा महत्वाचा फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) फेब्रुवारी महिन्यात वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी२० मालिकेत सहभागी झाला होता. मालिकेत तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना सूर्यकुमार दुखापतग्रस्त झाला. त्या सामन्यानंतर सूर्यकुमार राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये दुखापतीतून सावरण्यासाठी सराव करत आहे. सूर्यकुमारच्या हाताच्या बोटाला ‘हेयरलाईन’ फ्रॉक्चर आले होते. जहीर खानने सांगितल्यानुसार सूर्यकुमार राजस्थाविरुद्धच्या सामन्यातून संघात पुनरागमन करू शकतो.

आयपीएल २०२२ मधील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) त्यांचा दुसरा सामना खेणळ्यापूर्वी जहीर खान (Zaheer Khan) म्हणाला की, “तो (सूर्यकुमार) निवड प्रक्रियेसाठी उपलब्ध आहे. जसे की मी आधी सांगितेल होते, तो सराव करत आहे. त्यामुळे ही एक अशी गोष्ट आहे, ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो. तो पुढच्या सामन्यासाठी उपलब्ध आहे.”

मुंबई इंडियन्स चालू हंगामातील त्यांचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळला असून यामध्ये ४ विकेट्सने पराभव स्वीकारला होता. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) दुखापतग्रस्त झाला होता. शार्दुल ठाकुरने टाकेलला एक यॉर्कर चेंडूत ईशानच्या पायाच्या अंगठ्यावर लागला होता. या सामन्यात ईशानऐवजी आर्यन जुयालने यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडलेली.

पायाला चेंडू लागल्यामुळे पुढच्या सामन्यात ईशान खेळणार की नाही, याविषयी चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु ईशान किशनच्या फिटनेसविषयी जहीरने चांगली बातमी दिली आहे. तो म्हणाला की, “तो (ईशान किशन) पूर्णपणे ठीक आहे. तो नियमित सराव करत आहे. आम्हाला पुढच्या सामन्याआधी खूप वेळ मिळाला होता ज्याची त्याला मदत झाली.”

मुंबईने पहिल्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर आता राजस्थानविरुद्धचा दुसऱ्या सामन्यात संघ जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने मात्र त्यांच्या पहिल्या सामन्यात जबरदस्त प्रदर्शन करत सनरायझर्स हैदराबादला मात दिली होती. उभय संघाताल हा सामना पाहण्यासारखा असेल.

महत्वाच्या बातम्या –

अवघ्या ९ बॉलमध्ये भानुकाने आणला बवंडर! पाहा झंझावाती खेळीचा व्हिडिओ

मलिंगाचा मोठेपणा! स्वतःचाच विक्रम मोडल्यावर ब्रावोला दिल्या ‘खास’ शब्दात शुभेच्छा; लिहिले…

आयपीएल फॅन्ससाठी खूशखबर! आता अधिक क्षमतेचे जाता येणार स्टेडियममध्ये; महाराष्ट्र सरकारने दिली सूट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---