आयपीएल २०२२ च्या तिसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) यांच्यात आमना सामना झाला. या सामन्यात पंजाब किंग्जने आरसीबीकडून मिळालेले मोठे लक्ष्य गाठले आणि विजय मिळवला. आरसीबीला मात्र अनपेक्षितपणे पराभवाचा सामना करावा लागला. सामन्यात दोन्ही संघाच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली आणि मोठी धावसंख्या उभारली. यादरम्यान संघांना मोठ्या प्रमाणात अतिरिक्त धावाही मिळाल्या.
आरसीबीने सामन्यात प्रथम फलंदाजी केली. आरसीबीच्या फलंदाजीवेळी पंजाब किंग्जच्या गोलंदाजांनी अतिरिक्त धावांच्या रूपात २३ धावा दिल्या. तसेच पंजाब किंग्जच्या फलंदाजीवेळी आरसीबीच्या गोलंदाजांनी २२ अतिरिक्त धावा दिल्या. सामन्यात नो आणि वाईड चेंडू जास्त प्रमाणात टाकले गेल्यामुळे संपूर्ण सामन्यात एकूण ४५ अतिरिक्त धावा दिल्या गेल्या. आयपीएलच्या कोणत्याही सामन्यात सर्वाधिक अतिरिक्त धावा देण्याच्या बाबतीत आरसीबी आणि पंजाब किंग्जचा हा सामना पहिल्या क्रमांकावर आला आहे.
यादीत दुसऱ्या क्रमांकावर डेक्कन चार्जर्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळला गेलेला २००८ चा सामना आहे. या सामन्यात गोलंदाजांनी एकूण ३८ अतिरिक्त धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर यादीत तिसरा क्रमांक येतो पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात २०१० साली खेळला गेलला सामना. मुंबई आणि पंजाबमधील या सामन्यात गोलंदाजांकडून एकूण ३८ अतिरिक्त धावा दिल्या गेल्या होत्या.
दरम्यान, पंजाब आणि आरसीबीच्या या सामन्याचा विचार केला, तर पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २ विकेट्सच्या नुकसानावर २०५ धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने दिलेले २०६ धावांचे मोठे लक्ष्य पंजाब किंग्जने एक षटक शिल्लक ठेऊन गाठले. पंजाब किंग्जने १९ षटकात ५ विकेट्सच्या नुकसानावर २०८ धावा ठोकल्या आणि हंगामातील पहिला विजय मिळवला.
आरसीबीसाठी त्यांचा नवीन कर्णधार फाफ डू प्लेसिसने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याने ५७ चेंडू ८८ धावा केल्या. तसेच विराट कोहलीने ४१ आणि दिनेश कार्तिकने ३२ धावांचे महत्वाचे योगदान दिले. परंतु, पंजाब किंग्जसाठी ओडियन स्मिथने शेवटच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. स्मिथने अवघ्या ८ चेंडूंचा सामना केला आणि २५ धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या –
IPL2022| गुजरात वि. लखनऊ सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
भारतीय क्रिकेटचे पहिले विक्रमादित्य ‘पॉली उम्रीगर’, कर्णधारपद सोडले पण निर्णय नाही बदलला!
‘त्या’ महान अष्टपैलू क्रिकेटपटूने बरोबर ५८ वर्षापुर्वी घेतल्या होत्या ५ चेंडूत ५ विकेट्स…