---Advertisement---

‘कशाचा रनमशीन, हा तर डकमशीन’, पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून विराटची खरडपट्टी

Virat-Kohli
---Advertisement---

भारतीय संघाचा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहली आयपीएल २०२२मध्ये अद्याप कमाल दाखवू शकलेला नाही. मागच्या मोठ्या काळापासून खराब फॉर्मशी झगडणाऱ्या विराटला अजूनही सुरू गवसल्याचे दिसत नाहीये. रविवारी (८ मे) खेळल्या गेलेल्या डबल हेडरचा पहिला सामना आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पार पडला. विराट कोहली या सामन्यात स्वतःचे खातेही खोलू शकला नाही आणि पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे.

आरसीबीने या सामन्यात मोठ्या अंतराने हैदराबादला पराभूत केले, पण विराट कोहली (Virat Kohli) मात्र गोल्डन डक म्हणजेच पहिल्या चेंडूवर बाद झाला. विराटचे चाहते त्याच्या मोठ्या खेळीच्या प्रतिक्षेत आहेत, तर दुसरीकडे त्याचे टीकाकार त्याच्यावर निशाणा साधण्याची संधी शोधत असतात. अशात या सामन्यात एकही धाव न करू शकलेल्या विराटला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज आणि बेंगलोर यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात देखील एक प्रसंग घडला होता, ज्यामुळे नेटकरी विराटवर भडकले होते. या सामन्यात एमएस धोनी (MS Dhoni) जेव्हा बाद झाला, तेव्हा विराटला काहीतरी बोलताना पाहिले गेले होते. याच प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्याला ट्रोल केले गेले होते आणि धोनीच्या चाहत्यांमध्ये विराटविषयी नाराजी देखील निर्माण झाली होती. अशात विराट शून्यावर बाद झाल्यावर धोनीचे चाहते देखील विराटवर टीका करत आहेत.

https://twitter.com/ankush0allout/status/1523247031606669313?s=20&t=BzWdxnQv8I6VNjbU-Y8axw

दरम्यान, सनरायझर्स हैदराबद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (SRH vs RCB) यांच्यातील रविवारी खेळला गेलेला हा सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर पार पडला. आरसीबीने या सामन्यात प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि ३ विकेट्सच्या नुकसानावर १९२ धावा उभ्या केल्या होत्या. प्रत्युत्तरात जेव्ह हैदराबादचे सलामीवीर खेळपट्टीवर आले, तेव्हा ते संघाला चांगली सुरुवात देऊ शकले नाहीत. १९.२ षटकांमध्ये हैदराबाद संघाने १२५ धावा केल्या आणि सर्व विकेट्स गमावल्या. आरसीबीने हा सामना तब्बल ६७ धावांनी जिंकला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

हसरंगाने काढला हैदराबादचा घाम, ६७ धावांनी विजय मिळवत बेंगलोरने गुणतालिकेतील स्थान केले बळकट

‘कोणालाही कर्णधार बनवू, पण तुला नाही’, टीम इंडियाच्या कॅप्टन्सीबद्दल युवराज सिंगचा मोठा उलगडा

‘तो धड रनही बनवत नाहीये आणि विकेटही घेत नाहीये’, जडेजाच्या खराब फॉर्मबद्दल माजी दिग्गजाचे वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---