---Advertisement---

मेगा लिलावापूर्वी ‘थला’ चेन्नईत दाखल! १५ वर्षांत पहिल्यांदाच दिसणार ‘ते’ चित्र?

On: शुक्रवार, जानेवारी 28, 2022 6:59 AM
csk-ms
---Advertisement---

आयपीएल २०२२ (IPL 2022) पूर्वी फेब्रुवारी महिन्यात स्पर्धेचा मेगा लिलाव आयोजित केला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी (ms dhoni) याच्यासाही हा शेवटचा आयपीएल हंगाम असण्याची शक्यता आहे. अशात धोनी या हंगामाला अधिक गांभीर्याने घेत असल्याचे दिसते. मेगा लिलावाला अजून तीन आठवड्यापेक्षा तोडा कमी वेळ शिल्लक आहे, पण धोनी मात्र त्याच्या नियोजनासाठी आतापासूनच चेन्नईमध्ये दाखल झाला आहे.

मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारीला बेंगलोरमध्ये आयोजित केला जाणार आहे. त्यापूर्वी धोनी चेन्नईत लिलावाची रणनीती तयार करण्यासाठी दाखल झाल्याचे सांगितेल जात आहे. अशीही माहिती आहे की, धोनी स्वतः लिलावाच्या ठिकाणी  उपस्थित असणार आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, धोनी चेन्नईत आला आहे.  तो याठिकाणी मेगा लिलावाच्या तयारीवर चर्चा करेल. सूत्राने पुढे सांगितले की, कर्णधार धोनी मेगा लिलावात देखील उपस्थित राहू शकतो. परंतु हा त्याचा वैयक्तिक निर्णय असेल की, त्याला मेगा लिलावासाठी उपस्थित राहायचे आहे की, नाही.

https://twitter.com/ChennaiIPL/status/1486718693857906702?t=UVuHHF2jj72zq2BbIUcemg&s=19

मेगा लिलावापूर्वी अशीही चर्चा समोर आली आहे की, धोनी स्वतःकडचे चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडून रवींद्र जडेजाला ही जबाबदारी देईल. सूत्राने यासंदर्भात बोलताना सांगितले की, यासंदर्भात कधीच कोणती चर्चा झाली नाहीय. आम्ही योग्य वेळ आल्यावर याविषयी निर्णय घेऊ. धोनी आमचा कर्णधार आहे, तो चेन्नईचा पहिला खेळाडू आहे. जेव्हा तो कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेईल, तो त्याचा वैयक्तिक निर्णय असेल. सध्या आम्ही मेगा लिलावावर लक्ष केंद्रित करत आहोत.

दरम्यान, मेगा लिलावाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक आयपीएल फ्रेंचायझीला संघात चार खेळाडूंना रिटेन करण्याची संधी मिळाली होती. चेन्नईनेही त्यांच्या संघात चार खेळाडूंना संघात कायम ठेवले. यामध्ये रविंद्र जडेजाला चेन्नईने १६ करोड रुपयांमध्ये रिटेन केले. एमएस धोनीला चेन्नईने १२ करोड रुपयांमध्ये रिटेन केले. तर मोईल अली ८ करोड आणि ऋतुराज गायकवाडला ६ करोड रुपये मोजत चेन्नईने पुढच्या हंगामासाठी रिटेन केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

आगामी विश्वचषकापूर्वी बांगलादेशला मोठा झटका, महत्वाच्या फलंदाजाची टी२० मधून ६ महिन्यांसाठी विश्रांती

अजिंक्य क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय अण्णा नेवरेकर स्मृती करंडक 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत आदिनाथ क्रिकेट क्लब संघाचा विजय

‘या’ कारणामुळे मायदेशात वनडे, टी२० मालिका खेळण्यापासून मुकला अश्विन, विडिंजविरुद्ध बसाव लागलं बाहेर

व्हिडिओ पाहा –

आणि विराट कोहलीला धरावे लागले सचिनचे पाय । Virat Touched Sachin's Feet

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---