---Advertisement---

केकेआरला सपोर्ट करणारी ‘मिस्ट्री गर्ल’ निघाली अभिनेत्री, फोटोंवरुन हटणार नाही नजर!!

On: सोमवार, एप्रिल 11, 2022 6:27 PM
---Advertisement---

क्रिकेटच्या मैदानात अनेकदा काही सुंदर चेहरे चर्चेचा विषय ठरत असतात. कॅमेरामॅन अशा सुंदर चेहऱ्यांना सामन्यादरम्यान शोधून काढतोच आणि इतर चाहत्यांमध्ये त्या व्यक्तीविषयी उत्सुकता निर्माण होते. रविवारी (१० एप्रिल) खेळल्या गेलेल्या कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या सामन्यात देखील असाच एक चेहरा चर्चेचा विषय बनला. ही एक सुंदर अभिनेत्री असून केकेआरचे समर्थन करण्यासाठी मैदानात आली होती.

https://twitter.com/imAb_45/status/1513154195876356101?s=20&t=HFzbR2glHz6HqVLFat-lkA

उभय संघातील या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली आणि केकेआरला ४४ धावांनी मात दिली. या सामन्यात केकेआर संघ प्रथम फलंदाजीसाठी आला होता आणि त्याच वेळी टीव्ही स्क्रीनवर आली एक सुंदर मुलगी. तिचा फोटो सोशल मीडियावर त्वरित व्हायरल झाला आणि प्रत्येकाला तिचे नाव जाणून घेण्याची उत्सुकता लागली, जे आता समोर आले आहेत. ही मुलगी एक अभिनेत्री असून तिचे नाव आरती बेदी आहे. ती सामन्यात केकेआरला समर्थन करण्यासाठी आली होती आणि स्वतःच्या इंस्टाग्राम खात्यावूरन तिने याची स्टोरीही शेअर केली आहे.

https://www.instagram.com/p/CaRjDG6q1_Q/?utm_source=ig_web_copy_link

आरती बेदी एक प्रोफेशनल अभिनेत्री असून इंस्टाग्रामवर तिला तब्बल ३३ हजार फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते आणि चाहत्यांसाठी नेहमीत फोटो आणि व्हिडिओ देखील अपलोड करत असते. केकेआर आणि दिल्लीच्या सामन्यात आरती चांगलीच प्रकाशझोतात आली असून तिने याविषयी देखील इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. आरतीने तिच्या इंस्टाग्राम खात्यावून २४७ एका पेक्षा एक अशा पोस्ट शेअर केल्या आहेत.

https://www.instagram.com/p/COqAMSfHEW3/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, केकेआर आणि दिल्ली कॅपिट्स (KKR vs DC) यांच्यातील या सामन्याचा विचार केला, केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सला एक चांगली सुरुवात मिळाली आणि संघाने मर्यादित २० षटकांमध्ये २१५ धावांचा डोंगर उभा केला.

दिल्ली कॅपिटल्सकडून मिळालेल्या २१६ धावांचे लक्ष्य गाठण्याच्या प्रयत्नात केकेआर संघ १९.४ षटकात आणि १७४ धावा करून सर्वबाद झाला. परिणामी दिल्लीने ४४ धावा राखून विजय मिळवला. केकेआर पराभूत झाल्यानंतर आरती बेदी खूपच निराश झाल्याचे पाहायला मिळाले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

IPL 2022| मुंबईकर मित्रांचेच सामन्यापूर्वी एकमेकांना स्लेजिंग, शार्दुल-श्रेयसचा व्हिडिओ तुफान व्हायरल

‘…बडा पछताओगे’, कुलदीपने केकेआरला दिवसा चाँदणे दाखवत पूर्ण केला सूड, आल्या प्रतिक्रिया

युजवेंद्र चहल १५० आयपीएल विकेट्स घेणारा सहावा गोलंदाज, जाणून घ्या अन्य ५ जणांची नावं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---