आयपीएल २०२२ (IPL 2022) साठी बीसीसीआयने १२ आणि १३ फेब्रुवारीला मेगा लिलावाचे आयोजन केले. लिलावाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी अनेक दिग्गजांवर बोल्या लागताना दिसल्या. अनेक खेळाडू मोठ्या किंमतीत विकले गेले, तर काही खेळाडूंची मात्र निराशा झाला. यामध्ये अनेक खेळाडू असे होते, ज्यांना अपेक्षित रक्कम मिळाली नाही, तर काहीवर फ्रेंचायझींकडून बोलीच लावली गेली नाही. ज्या खेळाडूंवर बोली लागली नाही, त्यामध्ये दोन विश्वचषकविजेते कर्णधार देखील सहभागी आहेत.
इंग्लंडचा दिग्गज कर्णधार आणि ओएन मॉर्गन (eion morgan) आणि ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा अनुभवी कर्णधार एरॉन फिंच (Aaron Finch) यांच्यावर एकाही फ्रेंचायझीकडून बोली लावली गेली नाही. मॉर्गनने मेगा लिलावासाठी त्याची बेस प्राइस १.५ कोटी रुपये ठेवली होती, तर एरॉन फिंचची बेस प्राइसही १.५ कोटी रुपयेच होती. या दोघांकडे टी२० क्रिकेटचा चांगला अनुभव असला, तरी त्यांच्यावर एकाही फ्रेंचायझीने विश्वास दाखवला नाही आणि अखेरीस ते अनसोल्ड राहिले.
मॉर्गनचा विचार केला, तर त्याने मागच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व केले होते आणि संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवले होते. परंतु त्याचे वैयक्तिक प्रदर्शन मात्र समाधनकारक नव्हते. त्याने मागच्या आयपीएल हंगामात खेळलेल्या १७ सामन्यांमध्ये अवघ्या १३३ धावा केल्या होत्या. त्याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मॉर्गन एक मोठे नाव आहे. त्याने २०१९ विश्वचषकात इंग्लंडला विजेतेपद मिळवून दिले होते.
ऑस्ट्रेलियन संघाचा तुफानी फलंदाज एरॉन फिंच विचार केला, तर त्याने आयपीएल २०२२ साठी कोणत्याच फ्रेंचायझीने संघात सामील करण्यासाठी इच्छा दाखवली नाही. मागच्या आयपीएमध्येही तो अनसोल्ड राहिला होता. मागच्या वर्षी फिंचच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया संघाने टी२० विश्वचषक जिंकला होता. परंतु, तरीही मेगा लिलावात मात्र तो अनसोल्ड राहिला आहे. फिंचने टी२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. या दोन दिग्गजांव्यतिरिक्त लिलावात सुरेश रैना, स्टीव स्मिथ, इम्रान ताहीर अशा मोठ्या खेळाडूंनाही कोणत्या संघाने विकत घेतले नाहीय.
महत्वाच्या बातम्या –
मेगा ऑक्शनदरम्यान रंगली २ चेहऱ्यांची चर्चा, अँकर दिशा आणि भावनाबद्दल जाणून घ्या सर्वकाही
एडन मार्करमचा लिलावातही पराक्रम! हैद्राबादने विश्वास दाखवत लगावली भली मोठी बोली