आयपीएल २०२२ (IPL 2022) स्पर्धा २६ मार्चपासून सुरू होणार आहे. स्पर्धेचा सुरुवातीचा सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी आयपीएलचे साखळी फेरीचे सामने मुंबई आणि पुणे स्थित चार स्टेडियममध्ये आयोजित केले जाणार आहेत. अशी माहिती समोर येत आहे की, चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यात स्पर्धेचा पहिला सामना खेळला जाईल.
आयपीएलचा इतिहास पाहता मागच्या हंगामात जे दोन संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले होते, त्यांच्यात आगामी हंगामाचा पहिला सामना खेळवला जातो. आयपीएल २०२१ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज आणि ओएन मॉर्गनच्या नेतृत्वातील कोलकाना नाइट रायडर्स आमने-सामने होते. सीएसकेने २७ धावा राखून केकेआरला मात दिली होती आणि इतिहासातील त्यांची चौथी आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.
यावर्षी आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नवीन फ्रेंचायझी सहभागी होणार असल्यामुळे संघांची संख्या ८ ऐवजी १० असणार आहे. या १० संघात एकूण ७० साखळी सामने खेळले जातील. हे सामने ग्रुप ए आणि ग्रुप बी या पद्धतीने होतील. स्पर्धेतील ५५ सामने मुंबईच्या वानखडे, ब्रेबोर्न आणि डीवाय पाटील या तीन स्टेडियमवर खेळले जातील. तर पुणे स्टेडियममध्ये राहिलेले १५ सामने आयोजित केले जाणार आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार बांद्राच्या कुर्ला कॉम्पलेक्स आणि ठाण्याच्या दादोजी कोंडादेव स्टेडियमच्या संघांना सरावासाठी ठेवले जाईल.
सामना ज्याठिकाणी खेळला जाणार आहे, ते स्टेडियम आणि संघांच्या हॉटेलमधील अंतर पाहून महाराष्ट्र सरकारने बीसीसीआयला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे. संघांसाठी एक वेगळा रोड कॉरिडॉर ठेवला जाणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे गवर्निंग काउंसिलचे चेअरमन मिलिंद नारवेकर यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची बीसीसीआयसोबत बैठक झाली आहे. या बैठकीत महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. नारवेकरांनी सांगितल्याप्रमाणे स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी देण्याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील.
महत्वाच्या बातम्या –
बुमराहच्या गोलंदाजी दुसरं -तिसरं कोणी नाही, तर रोहितनेच बजावली मोठी भूमीका; ‘अशी’ केली मदत
कैफची रोहितला मिडास राजाची उपमा, म्हणाला, ‘त्याला हँडशेक करताना सावध, ज्याला हात लावतोय…’
तिसऱ्या टी२०साठी ‘अशी’ असू शकते भारताची ‘प्लेईंग ११’, इशान किशनऐवजी मयंक अगरवालची होऊ शकते निवड