इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) १५ वा हंगाम २६ मार्चपासून सुरु होत आहे. यापूर्वी सर्व संघांनी त्यांच्या कर्णधारांची नियुक्ती केली आहे. कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करताना दिसणार आहे. कोलकाता फ्रॅंचायझीने श्रेयसला १२ कोटी २५ लाखांना विकत घेतले आहे. तसेच ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला सुद्धा फ्रॅंचायझीने विकत घेतले आहे. आता कमिन्सने श्रेयस केकेआरचा नवा कर्णधार झाल्यानंतर मोठे व्यक्तव्य केले आहे. यावर्षी आयपीएलमध्ये १० संघ खेळताना दिसणार आहेत, तर सर्व सामने मुंबई आणि पुण्यामध्ये खेळले जाणार आहेत.
सध्या पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (PAK vs AUS) सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्य़ापूर्वी लाहोर येथे पॅट कमिन्सने श्रेयससोबतची एक आठवण सांगितली आहे. २०१७ साली पॅट कमिंस आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हे दोन खेळाडू दिल्ली डेयरडेविल्स या संघाचे भाग होते.
माध्यमांशी बोलताना तो म्हणाला की, “मी आणि श्रेयस अय्यर दिल्ली संघासाठी खेळलो आहे. आम्ही चांगली कामगिरी केली. तो खुप कूल आहे आणि सध्या चांगल्या फाॅर्ममध्ये आहे. मी आयपीएलमध्ये खेळण्यासाठी खुप उत्सुक आहे. मी माझ्या काही जवळच्या मित्रांसोबत खेळणार आहे. मी अजून काही काळ वाट पाहू शकत नाही.”
आयपीएलच्या १२ व्या हंगामात पॅट कमिन्सला केकेआर संघाने १५.५० कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्यानंतर तो २०२१ पर्यंत संघाचा भाग होता. २०२२ च्या लिलावात त्याला केकेआरने संघात कायम ठेवले नाही. परंतु २०२२ च्या लिलावादरम्यान फ्रॅंचायझीने त्याला ७.२५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. केकेआरने संघात कायम ठेवलेल्या खेळाडूंमध्ये आंद्रे रसल, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर आणि सुनिल नारायन या खेळाडूंचा समावेश आहे.
केकेआरच्या बदललेल्या संघ आणि स्वरुपाबाबत बोलताना पॅट कमिन्स म्हणाला की, “मी आयपीएलसाठी खुप उत्साहित आहे. हे खुप चांगले आहे की अधिकांश संघ एकत्र राहण्यासाठी सक्षम आहे.” केकेआरने २ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. केकेआरचा पहिला सामना २६ मार्चला सीएसके संघासोबत पार पडणार आहे. मागील वर्षी केकेआर संघ अंतिम फेरीत पोहोचला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
शुभमंगल सावधान! आयपीएल सुरू होण्यापूर्वी केकेआरचा दिग्गज अडकला लग्नबंधनात, फोटो व्हायरल
IPL 2022| सुरुवातीच्या षटकांमध्ये ‘हे’ पाच गोलंदाज प्रतिस्पर्धी संघांसाठी पडू शकतात महागात
आयपीएल इतिहासातील एकमेव भारतीय गोलंदाज, ज्याने केलाय २ वेळा ५ विकेट्स घेण्याचा कारनामा