आयपीएल २०२२च्या १६व्या सामन्यात चाहत्यांना मनोरंजनाचा परिपूर्ण डोस मिळाला. या सामन्यात गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज हे दोन संघ आमने- सामने होते. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत खेळला गेला असून गुजरात टायटन्सने एक जबरदस्त विजय साकार केला. अष्टपैलू राहुल तेवतियाने शेवटच्या चेंडूवर ६ धावांची गरज असताना एक उत्कृष्ट षटकार मारला आणि सामना जिंकवून दिला. या अप्रतिम प्रदर्शनासाठी तेवतियाचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे.
पंजाब किंग्जने दिलेले १९० धावांचे लक्ष्य गुजरात टायटन्सने अगदी शेवटच्या चेंडूवर गाठले आणि हंगामातील त्यांचा सलग तिसरा विजय मिळवला. दबावाच्या परिस्थिती अष्टपैलू राहुल तेवतिया (Rahul Tewatia) याने दाखवलेल्या धाडसी खेळीचे सर्वजण कौतुक करत आहेत. यामध्ये अनेक दिग्गज क्रिकेटपटू तसेच कलाविश्वातील मोठ्या नावांचाही समावेश आहे. भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) आणि बॉलिवुड अभिनेता रणवीर सिंग (Ranvir Singh) यांनीही ट्वीटच्या माध्यमातून तेवतियाची स्तुती केली आहे.
Waah Lord Tewatia,….
Need his statue in Punjab Kings dugout.
What a brainfade by Smith to concede a overthrow with 13 needed of 2. #PBKSvGT— Virender Sehwag (@virendersehwag) April 8, 2022
TEWATIA !!!!!!! TEWATIA !!!!!!!!!! OH MY GOHDDDDWhaaaaaaaaaaaaaaat !!!! 🤯🤯🤯🤯🤯🤯🤯🤯🤯🤯🤯🤯🤯🤯🤯🤯🤯🤯🤯🤯 #GTvsPBKS
— Ranveer Singh (@RanveerOfficial) April 8, 2022
No tournament gets close to the drama & finishes the #IPL brings … That was ridiculous … #Tewatia
— Michael Vaughan (@MichaelVaughan) April 8, 2022
Woaaaahhhhh!!!!! He’s done it again! #Tewatia pic.twitter.com/fFoDYH2GIv
— Gaurav Kapur (@gauravkapur) April 8, 2022
Tewatiaaaaa vs Punjab & a WI bowler. Same story! What a win!#Tewatia #GujaratTitans pic.twitter.com/5JUHiYLFEn
— Bhartendu Sharma (@Bhar10duSharma) April 8, 2022
This is where Punjab Kings lost.
It was just a run. But, Rahul Tewatia converted it to TWO POINTS!#IPL2022 #PBKSvGT #Tewatia pic.twitter.com/MSN7LPoM77
— Pradeep Krishna M (@PradeepKrish_m) April 8, 2022
सामन्याचा विचार केला, तर गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने सर्वप्रथम नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मयंक अगरवालच्या नेतृत्तवातील पंजाब किंग्जने ९ विकेट्सच्या नुकसानावर १८९ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सला विजयासाठी १९० धावांचे लक्ष्य मिळाले. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत खेळला गेला आणि गुजरातने अखेर बाजी मारली.
प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जसाठी त्यांचा मध्यक्रमातील फलंदाज अवघ्या २१ चेंडूत अर्धशतक पूर्ण करत एकूण ६४ धावांचे योगदान दिली, तर गुजरातसाठी फिरकी गोलंदाज राशिद खानने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर दुसऱ्या बाजूला गुजरात टायटन्सच्या फलंदाजीवेळी युवा शुबमन गिलने डावाची चांगली सुरुवात करून दिली. शतकाला अवघ्या ४ धावा कमी असताना म्हणजेच ९६ धावा करून गिल बाद झाला. या उत्कृष्ट खेळीसाठी गिलला सामनावीर निवडले गेले.
गुजरात टायटन्सच्या फलंदाजीवेळी शेवटच्या षटकात ओडियन स्मिथ गोलंदाजी करत होता. षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर गुजरातला विजयासाठी १२ धावांची आवश्यकता होती आणि त्यावेळी खेळपट्टीवर राहुल तेवतियाने उपस्थित होता. तेवतियाने ओडियन स्मिथने टाकलेले शेवटचे दोन्ही चेंडू निर्भीडपणे सीमारेषेपार भिरकावले आणि विजय मिळवला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
इंग्लंड विरुद्ध भारत मालिकांचे वेळापत्रक जाहीर, स्थगित झालेली पाचवी कसोटीही होणार ‘या’ तारखेला