लखनऊ सुपर जायंट्सचा वरच्या फळीतील फलंदाज दीपक हुड्डाने शुक्रवारी (२९ एप्रिल) स्वतःच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद केली. लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील हा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात लखनऊने २० धावांनी विजय मिळवला. दरम्यान हुड्डाने आयपीएलमधील त्याच्या वैयक्तिक १००० धावा देखील पूर्ण केल्या.
लखनऊचा कर्णधार आणि सलामीवीर केएल राहुल अवघ्या ६ धावा करून डावातील तिसऱ्या षटकात बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला दीपक हुड्डा (Deepak Hooda). या सामन्यात हुड्डाने २८ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३४ धावा साकारल्या. या धावा करून हुड्डा धावबाद झाला. यादरम्यान त्याने स्वतःच्या १००० आयपीएल धावा मात्र पूर्ण केल्या. हुड्डाच्या आयपीएल कारकिर्दीतील हा महत्वाचा टप्पा नक्कीच आहे, पण या धावा करण्यासाठी त्याला तब्बल ७१ वेळा खेळपट्टीवर यावे लागले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
हुड्डा सर्वात संथगतीने आयपीएलमध्ये स्वतःच्या १००० धावा पूर्ण करणारा खेळाडू बनला आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर केदार जाधव आहे. केदारला स्वतःच्या १००० आयपीएल धावा करण्यासाठी ६२ वेळा खेळपट्टीवर यावे लागले होते. यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे पंजाब किंग्जचा सध्याचा कर्णधार मयंक अगरवाल. मयंकने ही कामगिरी ६१ डावांमध्ये केली होती.
दरम्यान, लखनऊ आणि पंजाब (LSG vs PBKS) याच्यात शुक्रवारी पार पडलेल्या या सामन्याचा विचार केला, तर पंजाबला विजयासाठी २० धावा कमी पडल्या आणि लखनऊने सामना नावावर केला. पंजाबचा कर्णधार मयंक अगरवालने नाणेफेक जिंकली आणि लखनऊला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना लखनऊने ८ विकेट्सच्या नुकसानावर १५३ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जला मात्र लक्ष्य गाठता आले नाही. पंजाबने निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या नुकसनावर १३३ धावांपर्यंत मजल मारली.
सर्वात संथगतीने वैयक्तिक १००० आयपीएल धावा करणारे खेळाडू
७१ डाव- दीपक हुड्डा*
६२ डाव- केदार जाधव
६१ डाव- मयंक अगरवाल
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये लसिथ मलिंगावरही भारी पडला कागिसो रबाडा; नावावर केला ‘हा’ मोठा विक्रम
कोलकाताला धूळ चारल्यानंतर वॉर्नरने पत्नीसोबत ठुमके लावत साजरा केला आनंद; पोरींनीही दिली साथ