आयपीएल २०२२ मधील अंतिम सामना रविवारी (दि. २९ मे) गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर म्हणजेच नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला हा सामना गुजरात टायटन्सने ७ विकेट्सने आपल्या खिशात घातला. यासह गुजरात संघाने पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी उंचावली. या सामन्यानंतर पुरस्कार वितरण संमारंभ पार पडला. यावेळी पुरस्कार विजेत्या संघांना आणि खेळाडूंना मोठी बक्षीस रक्कमही देण्यात आली.
अंतिम सामन्यात विजेतेपद मिळणाऱ्या गुजरात संघाला सर्वाधिक २० कोटींचे बक्षीस मिळाले, तर उपविजेत्या ठरलेल्या राजस्थान संघाला १३ कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले. याशिवाय प्लेऑफमध्ये स्थान मिळवलेले अन्य दोन संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांनाही बक्षीस मिळाले. तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला ७ कोटी रुपये आणि चौथ्या क्रमांकावरील लखनऊ सुपर जायंट्स संघाला ६.५ कोटी रुपये बक्षीस दिले गेले.
आयपीएल २०२२ चे पुरस्कार
विजेते- गुजरात टायटन्स- २० कोटी रुपये
उपविजेते- राजस्थान रॉयल्स- १३ कोटी रुपये
क्वालिफायर २ मध्ये पराभूत संघ– रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- ७ कोटी रुपये
एलिमिनेटरमध्ये पराभूत संघ- लखनऊ सुपर जायंट्स- ६.५ कोटी रुपये
अंतिम सामन्यातील सामनावीर– हार्दिक पंड्या, गुजरात टायटन्स – ५ लाख रुपये
ऑरेंज कॅप- जोस बटलर (८६३ धावा), राजस्थान रॉयल्स – १० लाख रुपये
पर्पल कॅप- युजवेंद्र चहल (२७ विकेट्स), राजस्थान रॉयल्स – १० लाख रुपये
सर्वाधिक षटकार- जोस बटलर (४५ षटकार), राजस्थान रॉयल्स – १० लाख रुपये
एमर्जिंग प्लेअर- उमरान मलिक, सनरायझर्स हैदराबाद – १० लाख रुपये
सर्वोत्तम झेल – एव्हिन लुईस, लखनऊ सुपर जायंट्स – १० लाख रुपये
सुपर स्ट्रायकर ऑफ द सिजन – दिनेश कार्तिक, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – टाटा पंच कार
गेम चेंजर – जोस बटलर, राजस्थान रॉयल्स – १० लाख रुपये
पॉवर प्लेअर – जोस बटलर – १० लाख रुपये
व्यॅल्युएबल प्लेअर– जोस बटलर, राजस्थान रॉयल्स – १० लाख रुपये
फेअर प्ले अवॉर्ड– राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2022: फायनलमधील जबरदस्त फटकेबाजीमुळे हार्दिक पंड्या बनला सामनावीर, पाहा याआधीचे ‘मॅन ऑफ द मॅच’
नाद करा पण आमचा कुठं! आयपीएलची पर्पल कॅप डोक्यावर मिरवणारे गोलंदाज, चहल राजस्थानचा पहिला रॉयल खेळाडू