राजस्थान रॉयल्स संघाने रविचंद्रन अश्विनला खरेदी करण्यासाठी आयपीएल लिलावात दिल्ली संघासोबत स्पर्धा केली. या फिरकी गोलंदाजाकडून रियान परिगला (riyan paran) गोलंदाजी शिकायची आहे, त्याने या मागचे कारण सुद्धा सांगितले आहे. अश्विनला आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल्सने (rajsthan royals) ५ कोटी रुपयांना विकत घेतले. राजस्थान संघाने पहिल्या आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते. रियान पराग हा मुंबई येथे आपल्या संघाशी जोडला गेला आहे. त्यांनांतर त्याने अश्विनबाबत पतिक्रिया दिली आहे.
अश्विनकडून अनेक गोष्टी शिकण्याची इच्छा असल्याचे अष्टपैलू परागने सांगितले. पराग आयपीएलमधील चौथा हंगाम रॉयल्ससोबत खेळणार आहे. अश्विनसोबत काम करण्याची तो आतूरतेने वाट पाहत असल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला की, अश्विन जगातील सर्वोत्तम ऑफस्पिनर्स पैकी एक आहे.
तो म्हणाला की, “आयपीएल पांढर्या चेंडूने खेळली जाणार असली तरी, मी माझ्यासोबत लाल चेंडू आणीन. जेणेकरून, मला स्पर्धेत अश्विनकडून काहीतरी शिकता येतील. या अष्टपैलू खेळाडूने सांगितले की, “स्पर्धेदरम्यान तो गोलंदाजी करत असताना त्याच्या रणनीतीचा अभ्यास करण्याचा मी प्रयत्न करेल.”
आयपीएलच्या या हंगामानंतर मी पांढऱ्या चेंडूने गोलंदाजी अधिक चांगली करेल, असा विश्वास परागला आहे. मूळचा गुवाहाटीचा असलेला पराग आत्तापर्यंत ३० आयपीएल सामने खेळला आहे आणि लीगच्या चौथ्या सत्रात तो कसा खेळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आयपीएलचा पहिला सामना २६ मार्च रोजी केकेआर आणि सीएसके या दोन संघामध्ये खेळला जाणार आहे. यावर्षी आयपीएल मुंबई आणि पुण्यामधील चार स्टेडियममध्ये खेळले जाणार आहेत. यावर्षी हंगामात ८ नव्हे तर १० संघ खेळताना दिसणार आहेत. यावर्षी आयपीएलच्या स्वरुपात बदल करण्यात आला आहे. सर्व संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. हे संघ आपल्या गटातील संघासोबत एक तर दुसऱ्या गटातील संघासोबत २ सामने खेळणार आहेत. आयपीएल २०२२ चा अंतिम सामना २९ मे ला खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
गुजरात टायटन्ससाठी खूशखबर! कॅप्टन हार्दिकला आयपीएल खेळण्यासाठी ग्रीन सिग्नल
व्वा! मागे धावत हरमनप्रीतचा शानदार ‘हवाई’ झेल, कोलांट्या खाल्यानंतरही सोडला नाही चेंडू- Video
अस्सल मुंबईकर ‘तात्या’ आले! पोलार्डच्या आगमनाचा खास व्हिडिओ पाहाच