शनिवारी (२१ मे) मुंबईच्या वानखडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल्सला धूळ चारली. मुंबईने ५ विकेट्सने हा सामना जिंकला. या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला. आरसीबीला आता प्लेऑफमध्ये स्थान मिळाले आहे. ही आयपीएलच्या इतिहासातील आठवी वेळ आहे, जेव्हा आरसीबीने प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर म्हणजेच आरसीबी, आयपीएलच्या इतिहासातील तिसरा असा संघ आहे, ज्यांनी सर्वाधिक वेळा प्लेऑफ फेरी गाठली आहे. आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्सने सर्वात आधी प्लेऑफ फेरीत जागा पक्की केली होती. त्यानंतर राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सने देखील प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले होते. शेवटच्या स्थानासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबीमध्ये संघर्ष सुरू होता. पण मुंबईकडून मिळालेल्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आणि आरसीबीने बाजी मारली.
आयपीएलचा हा १५ वा हंगाम आहे आणि यामध्ये सर्वात जास्त वेळा, जर कोणता संघ प्लेऑफमध्ये पोहोचला असेल, तर तो चेन्नई सुपर किंग्ज आहे. सीएसकेला आतापार्यंत ११ हंगामांमध्ये प्लेऑफ फेरी गाठली आहे. परंतु, चालू हंगामात मात्र त्यांना प्लऑफमध्ये पोहोचता आले नाही. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सआहे, ज्यांनी ९ हंगामांमध्ये प्लेऑफ फेरी गाठली आहे. मुंबई इंडियन्स देखील यावर्षी प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाहीये. तिसऱ्या क्रमांकावरील आरसीबी मात्र चालू हंगामात प्लेऑफमध्ये दाखल झाला आहे. चौथ्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्स ७ वेळा आयपीएल प्लेऑफमध्ये पोहोचला आहे, पण यावर्षी त्यांना देखील इथपर्यंत पोहोचता आले नाही.
सर्वाधिक वेळा प्लेऑफ फेरी गाठणारे आयपीएल संघ
११ – चेन्नई सुपर किंग्ज
९ – मुंबई इंडियन्स
८ – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
७ – कोलकाता नाईट रायडर्स
दरम्यान, शनिवारी मुंबईने दिल्लीला पराभूत करणे आरसीबीसाठी अत्यंत महत्वाचे होते. जर दिल्लीने हा सामना जिंकला असता, तर त्यांनी आरसीबीला प्लेऑफमधून बाहेर काढले असते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रोहित शर्मासारखा दिग्गज आयपीएल २०२२मध्ये ठरला अपयशी, नाही करता आली ‘ही’ सोपी कामगिरी






