विराट कोहली (virat kohli) याने मागच्या काही महिन्यांपासून त्याच्याकडील सर्व संघांचे कर्णधारपद सोडले आहे. या सत्राची सुरुवात आयपीएल २०२१ नंतर झाली, जेव्हा त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्याने एकापाठोपाठ भारताच्या टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले आहे. परंतु आता आयपीएलच्या पुढच्या हंगामात विराट पुन्हा एकदा आरसीबीचा कर्णधार बनण्याची शक्यता आहे. आरसीबी संघाचे अध्यक्ष प्रथमेश मिश्रांनी यासंदर्भात महत्वाचे संकेत दिले आहेत.
विराटने मागचा हंगाम संपल्यानंतर आरसीबीचे कर्णधारपद सोडले आणि नवीन कर्णधारासाठी चर्चा सुरू झाल्या. अशात श्रेयस अय्यर आणि ग्लेन मॅक्लवेलचे नाव आरसीबीच्या नव्या कर्णधाराच्या रूपात सर्वात आघाडीवर होते. परंतु माध्यमांतील वृत्तानुसार विराट आता आरसीबीचे कर्णधारपद पुन्हा स्वीकारू शकतो.
व्हिडिओ पाहा- आणि विराट कोहलीला धरावे लागले सचिनचे पाय
आरसीबी अध्यक्षांनी यासंदर्भात माहिती दिली की, “विराटने अनेक अविस्मरणीय हंगामांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वात संघाने अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. आम्हाला त्याला कर्णधाराच्या रूपात कायम ठेवायला आवडेल. आम्ही त्याला कर्णधारपद पुन्हा स्वीकरण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न करू.”
अध्यक्षांनी यावेळी बोलताना असेही सांगितले की, जर विराटने कर्णधाराच्या भूमिकेसाठी सहमती दर्शवली, तर तो आरसीबीचा कर्णधार असेल. जर तो यासाठी सहमत नसेल, तर मात्र संघाना मेगा लिलावात नवीन कर्णधार शोधावा लागणार आहे. आयपीएल २०२२ पूर्वी बीसीसीआयने मेगा लिलाव आयोजित केलाआहे, जो १२ आणि १३ फेब्रुवारीला होईल. अशात सर्व संघ मेला लिलावात चांगल्या खेळाडूंवर मोठी बोली लावताना दिसतील.
दरम्यान, विराटने २०१३ मध्ये सर्वप्रथम आरसीबी संघाचे नेतृत्व स्वीकरले होते. त्यानतंर तो मागच्या ८ हंगामांमध्ये संघाचे नेतृत्व करत आला, पण त्याला एकदाही स्पर्धेचे जेतेपद जिंकता आले नाही. त्याच्या नेतृत्वात आरसीबीने मागच्या हंगामात एलिमिनेटर सामन्यात कोलताना नाइट रायडर्सकडून पराभव पत्करला होता. त्याने आतापर्यंत १४० आयपीएल सामन्यात संघाचे नेतृत्व केले, त्यापैकी ६६ सामने संघाने जिंकले, तर ७० सामन्यात संघ पराभूत झाला.
महत्वाच्या बातम्या –
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेपूर्वी रोहितने घटवलं ‘इतके’ किलो वजन, फोटो भन्नाट व्हायरल
शेवटचे षटक, १२ धावांची गरज अन् २ चेंडूंवर गेल्या २ विकेट्स, सिडनी सिक्सर्सची अशी फायनलमध्ये धडक
व्हिडिओ पाहा –