---Advertisement---

IPL2022| बेंगलोर वि. कोलकाता सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

On: बुधवार, मार्च 30, 2022 1:11 PM
RCB-vs-KKR
---Advertisement---

आयपीएल २०२२ चा ६ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन बलाढ्य संघांमध्ये होणार आहे. हा सामना मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर रात्री ७.३० मिनिटांनी सुरू होईल. या दोन्ही संघांचा हा चालू आयपीएल हंगामातील दुसरा सामना असेल. चला तर नजर टाकूया कोणते खेळाडू या सामन्यात चांगले प्रदर्शन करू शकतात आणि ड्रीम इलेव्हन संघात कोणत्या ११ खेळाडूंना निवडणे योग्य राहील.

कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाने त्यांचा पहिला सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जसोबत खेळला आणि त्यामध्ये विजय देखील मिळवला. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यामुळे केकेआर त्यांच्या या दुसऱ्या सामन्यात पूर्ण आत्मविश्वासासह मैदानात उतरेल. तर दुसरीकेडे रॉयल चॅलेंजर्से बेंगलोर (RCB) आहे, ज्यांनी त्यांच्या पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जकडून पराभव पत्करला. आरसीबीने या सामन्यात मोठी धावसंख्या केली, पण पंजाबच्या फलंदाजांनी त्याहीपेक्षा चांगले प्रदर्शन करून विजय मिळवला. अशात केकेआरला पराभूत करून आरसीबी त्यांचा पहिला गुण मिळवू इच्छित असेल.

पहिल्या सामन्यात आरसीबीसाठी त्यांचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने तुफान फटकेबाजी करत ८८ धावा केल्या होत्या. तसेच माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकची त्यांना चांगली साथ लाभली होती. विराट आणि कार्तिकने अनुक्रमे ४१ आणि ३२ धावा करून नाबाद राहिले होते. तर केकेआरसाठी अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने पहिल्या सामन्यात महत्वाच्या ४४ धावा केल्या. तसेच वेगवान गोलंदाज उमेश यादवने पॉवर प्लेमध्ये २ महत्वाच्या विकेट्सही घेतल्या.

असा बनवू शकतो ड्रीम ११ –
कर्णधार – फाफ डू प्लेसिस
उपकर्णधार – हर्षल पटेल
यष्टीरक्षक – दिनेश कार्तिक
फलंदाज – विराट कोहली, अजिंक्य रहाणे, नितिश राणा, श्रेयस अय्यर
अष्टपैलू – वनिंदू हसरंगा, सुनील नारायण
गोलंदाज – वरुण चक्रवर्ती, उमेश यादव, मोहम्मद सिराज

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची संभावित प्लेइंग इलेव्हन –
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, शेरफेन रदरफोर्ड, शाहबाज अहमद/महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हर्षल पटेल, वनिंदु हसरंगा, डेविड विली, आकाश दीप, मोहम्मद सिराज.

कोलकाता नाइट राइडर्सची संभावित प्लेइंग इलेव्हन –
वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, सॅम बिलिंग्स, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शेल्डन जॅक्सन (यष्टीरक्षक), उमेश यादव, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती.

महत्वाच्या बातम्या –

IPL 2022 | स्टेडियममधील प्रेक्षकांची टक्केवारी वाढणार? बीसीसीआयचा लवकरच निर्णय

एसपी गोसावी मेमोरियल पुणे आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धा ३ एप्रिल रोजी

आजच्याच दिवशी ११ वर्षांपूर्वी भारताने पाकिस्तानला पाणी पाजत मिळवला होता विश्वचषकातील सर्वात मोठा विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---